BIG NEWS : लाडकी बहिण योजनेबाबत अतिशय महत्वाची अपडेट

BIG NEWS : लाडकी बहिण योजनेबाबत अतिशय महत्वाची अपडेट

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थींना आर्थिक मदत वेळेवर मिळावी यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेसाठी आता अधिकृत संकेतस्थळावर https://ladakibahin.maharashtra.gov.in येथे e-KYC सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून मोबाईलवरूनही सहजरीत्या करता येणार आहे. पुढील दोन महिन्यांत सर्व लाभार्थ्यांनी e-KYC पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

योजनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना तटकरे म्हणाल्या, “राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचा निर्णायक सहभाग बळकट करण्यासाठी ही योजना राबवली जाते. थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) पद्धतीने मदत देण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले जात आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, ही प्रक्रिया सोप्या, सुलभ आणि सुरक्षित पद्धतीने करता येईल. महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही e-KYC पूर्ण करू शकतील. त्याचबरोबर, या प्रक्रियेसंदर्भात कोणीही आर्थिक मागणी केली तर त्याला बळी पडू नये, असेही आवाहन त्यांनी केले.

👉 थोडक्यात, e-KYC अनिवार्य झाल्याने लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळणार असून, भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेणेही सोपे होणार आहे.