मुंबई, भारत, जुलै 2025: जागतिक आयव्हीएफ दिनानिमित्ताने इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयाने ‘आयव्हीएफ सक्सेस कॅल्क्युलेटर’ हे नवे डिजीटल माध्यमावरील एप्लिकेशन बाजारात उपलब्ध केले आहे. प्रजनन आरोग्याच्या उपचारासंबंधी इत्यंभूत माहिती या डिजीटल व्यासपीठावर दिली जाईल. हे कॅल्क्युलेटर भारतातील प्रजनन उपचारांमध्ये नवी क्रांती घडवण्यास सज्ज झाले आहे. रुग्णांच्या वैद्यकीय माहितीच्या आधारे त्यांनी आयव्हीएफ उपचारांची निवड केल्यास या उपचारांमधील गर्भधारणेची संभाव्यता तसेच त्याकरिता आवश्यक सायकलची (चक्र) संख्या याबद्दलचा वैयक्तिक आणि अचूक अंदाज या डिजीटल माध्यमावर दिला जाईल. हे कॅलक्युलेटर इच्छुक पालकांना त्यांच्या डॉक्टरांच्या पहिल्या भेटीच्या नियोजनापूर्वी मूलभूत माहितींची स्पष्टता देण्यासाठी तयार केले आहे. जोडप्यांना डॉक्टरांच्या भेटीअगोदरच आवश्यक सर्व माहिती पुरवली जाईल. रुग्णांना सुरुवातीच्या टप्प्यातच मार्गदर्शन देऊन सर्वोत्तम उपचार देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे कॅलक्युलेटर ऑनलाईन माध्यमांवर विनामूल्य उपलब्ध आहे. ‘आयव्हीएफ सक्सेस कॅल्क्युलेटर’ जोडप्यांची तसेच संबंधित रुग्णांची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाईल. अतिशय दुर्गम भागांत राहणा-या रुग्णांनाही या डिजीटल माध्यमाचा वापर करुन प्रजनन आरोग्याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. हे डिजीटल माध्यम वापरण्यासही अगदी सोप्पे आहे.
हे कॅल्क्युलेटर रुग्णांच्या वैद्यकीय माहितीचे विश्लेषण करुन काही मिनिटांतच संपूर्ण अहवाल देईल. या अहवालात रुग्णाची गर्भधारणेची शक्यता, पीसीओएस किंवा शुक्राणूंच्या असामान्य प्रजनन-संबंधित समस्यांवरही माहिती उपलब्ध असेल. वैद्यकीय अहवालाच्या आधारे उपचारांविषयी तसेच जीवनशैलीतील आवश्यक सुधारणाही सूचवल्या जातील. आयव्हीएफ यश कॅलक्युलेटरमध्ये माहिती अपलोड करण्यासाठी सोयीस्कर पद्धती उपलब्ध केली आहे. रुग्णाची एएमएच पातळी, शुक्राणूंची संख्या, त्यांची गतिशीलता यांसारखे महत्त्वाचे वैद्यकीय तपशील तसेच जुने वैद्यकीय अहवाल सोप्या रितीने अपलोड करता येतात. ही माहिती अपलोड होताच काही मिनिटांतच रुग्णाच्या गर्भधारणेच्या संभाव्यतेचा अचूक अंदाज दिला जातो.
या प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी इंदिरा आयव्हीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक डॉ. क्षितिज मुर्डिया यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आयव्हीएफ सक्सेस कॅलक्युलेटरमुळे लोकांना त्यांच्या वैद्यकीय माहितीच्या आधारे उपचारांनंतरच्या गर्भधारणेच्या संभाव्यतेची माहिती दिली जाईल. यामुळे रुग्णांना उपचारांची नेमकी दिशा समजेल. हा प्रकल्प आमच्या नवकल्पकतेर भर देण्याच्या धोरणात्मक तरतूदींचा भाग आहे. रुग्णांना आवश्यक माहितीची सखोल मार्गदर्शन करण्यात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असा आमचा ठाम विश्वास आहे.’’
या कॅल्क्युलेटरमधून मिळणा-या आकड्यातून एक, दोन आणि तीन आयव्हीएफ सायकलमधील (चक्र) अपेक्षित गर्भधारणेच्या संभाव्यतेची माहिती दिली जाते. यामुळे प्रत्येक टप्प्यावर लोकांना अधिक स्पष्टता आणि आत्मविश्वासाने माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल, असा विश्वास इंदिया आयव्हीएफच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
इंदिया आयव्हीएफचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नितीझ मुर्डिया म्हणाले, ‘‘आयव्हीएफ उपचारांसाठी भेट देणा-या अनेक रुग्णांना उपचारांबद्दल फारशी माहिती नसते. आयव्हीएफ वैद्यकीय उपचारांबद्दल अनेकदा गैरसमज आढळून येतात. आयव्हीएफ सक्सेस कॅल्क्युलेटरमध्ये रुग्णांना या उपचारपद्धतींची इत्यंभूत माहिती दिली जाते. जोडप्यांना उपचार सुरु करण्यापूर्वी त्यांच्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या काय योग्य आहे, हे समजून घेण्यास मदत होते. यामुळे रुग्णांना वेळेवर निर्णय घेणे सोप्पे होते. उपचारांबाबत संकोच दूर सारला जातो. रुग्णांना उपचारांसाठी अधिक माहितीपूर्ण दृष्टिकनो स्विकारण्यास प्रोत्साहन मिळते. रुग्णांसाठी जागरुकता, उपलब्धता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्याच्या आमच्या दूरदृष्टीचा हा महत्त्वाचा भाग आहे.’’
इंदिया आयव्हीएफने देशभरात १६५ हून अधिक क्लिनिक्सची यशस्वी उभारणी केली आहे. या क्लिनिक्सच्या माध्यमातून असंख्य जोडप्यांना १.७५ लाखांहून अधिक यशस्वी आयव्हीएफ गर्भधारणा झाली आहे. इंदिरा आयव्हीएफ देभभरातील गरजू रुग्णांसाठी प्रजननासंबंधित उपचार अधिक विश्वासार्ह आणि सोप्पे बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता इंदिरा आयव्हीएफच्या संकेतस्थळावर आयव्हीएफ सक्सेस कॅल्क्युलेटर लाईव्हही उपलब्ध आहे. सुजाण पालकत्वाच्या दिशेने प्रवास करणा-या रुग्णांसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. यामुळे रुग्णांना उपचारांमधील यशस्वी गर्भधारणेबद्दल तपशीलवार माहिती उपलब्ध होईल.