Axis Capital कडून Signature Global खरेदीची शिफारस; २२% वाढीचा अंदाज

By: Editor_Manas

On: Saturday, February 21, 2026 4:59 PM

Google News
Follow Us

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२६ : ब्रोकरेज फर्म अ‍ॅक्सिस कॅपिटलने सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडसाठी ‘बाय’ रेटिंग देण्याची शिफारस केली आहे. कंपनीने नुकतीच आरएमझेड सोबत भागीदारीद्वारे व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेशाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. हा कंपनीच्या वाढीचा प्रमुख चालक असल्याचा दाखला अॅक्सिस कॅपिटलने दिला आहे.

अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजने कंपनीचे ‘बाय’ रेटिंग १,३०० रुपयांच्या लक्ष्य किमतीसह कायम ठेवले आहे. या स्टॉकच्या किमतीत २२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता त्यातून दर्शविण्यात आली आहे. सिग्नेचर ग्लोबलचा शेअर १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरुवातीच्या व्यवहाराच्या वेळेत प्रति शेअर १०७०.१० रुपयांवर उघडला.

ब्रोकरेज फर्मच्या शिफारसी

अ‍ॅक्सिस कॅपिटलने त्यांच्या अहवालात सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडवरील ‘बाय’ शिफारसीमागील खालील घटकांवर प्रकाश टाकला आहे.  सिग्नेचर ग्लोबलने आपल्या विविधीकरण धोरणाच्या अनुषंगाने, दक्षिण भारतातील आघाडीचे लीजिंग अॅसेट डेव्हलपर असलेल्या आरएमझेडसोबत संयुक्त उपक्रमाद्वारे व्यावसायिक रिअल इस्टेट विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

सुमारे ५५ लाख चौरस फूट नियोजित भाडेपट्टा क्षेत्रासह कार्यालय-केंद्रित, संमिश्र वापराच्या ग्रेड-ए मालमत्तेच्या विकासाचा या भागीदारीमध्ये समावेश आहे. कार्यालयीन जागेसोबतच किरकोळ आणि हॉटेल घटकांचाही या प्रकल्पात समावेश असेल. ही मालमत्ता गुरुग्राममधील सेक्टर ७१ मधील सदर्न पेरिफेरल रोड येथे असेल. सिग्नेचर ग्लोबलकडे कार्यान्वयाच बळकट क्षमता आणि विकासाचा अनुभव आहे, तर आरएमझेड संस्थात्मक दर्जाच्या व्यावसायिक मालमत्तेची संकल्पना आणि विकास करण्यातील तिच्या तज्ज्ञतेचा वापर करेल.

हे बांधकाम पुढील सहा ते नऊ महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा असून हा  प्रकल्प सुमारे पाच वर्षांत पूर्ण होईल. तो पूर्ण झाल्यानंतर कंपनीला ऑफिस आणि रिटेल विभागांमधून अनुक्रमे प्रति चौरस फूट अंदाजे १२५ रुपये आणि प्रति चौरस फूट २५० रुपये मासिक भाडे मिळण्याची अपेक्षा आहे.

या व्यवहाराचा एक भाग म्हणून आरएमझेड ही सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या गुरुग्राम कॉमर्सिटी लिमिटेडमध्ये (जीसीएल) ५० टक्के इक्विटी हिस्सा मिळवण्याच्या बदल्यात १२.८ अब्ज रुपये गुंतवेल.या कंपनीची एकूण विकासक्षमता सुमारे ७५ लाख चौरस फूट एवढी आहे. त्यापैकी जवळजवळ ७० टक्के (अंदाजे ५५ लाख चौरस फूट) व्यावसायिक विकासासाठी राखीव आहे, तर उर्वरित क्षेत्र निवासी वापरासाठी नियुक्त केले आहे.

“या मालमत्तेसाठी अजून पाच वर्षे बाकी आहेत. त्यामुळे, आर्थिक वर्ष २८ पूर्वीपर्यंत आमच्या महसूल/कमाईच्या अंदाजांवर तिचा परिणाम होईल, असे आम्हाला वाटत नाही. या व्यवहारात जमिनीचे मूल्य २६ अब्ज रुपये असल्याचे सूचित केले असले तरी आम्ही ३४ अब्ज रुपयांचे विकासमूल्य निश्चित केले आहे. भांडवली खर्च आणि भविष्यातील सवलती यांचा विचार करता ते वाजवी वाटते. आम्ही आमचा टीपी रु. १३०० एवढा कायम ठेवला आहे,” असे अ‍ॅक्सिस कॅपिटलने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026