टाटा एआयएने महाराष्ट्रात २३५ एमडीआरटी पात्र एजंट्स नोंदवून आपल्या मजबूत एजन्सी वितरण क्षमतेचा ठसा उमटविला

पुणे आणि नाशिक, जुलै 2025: भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (टाटा एआयए) ने महाराष्ट्रात एकूण 235 एमडीआरटी (मिलियन डॉलर राउंड टेबल) पात्र सल्लागार नोंदवून आर्थिक सल्ला सेवांमधील उत्कृष्टतेसाठी आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे. 2025 च्या जागतिक एमडीआरटी क्रमवारीनुसार, नाशिकमधून 31 आणि पुण्यातून 97 सल्लागारांनी एमडीआरटी पात्रता मिळविली आहे.

2025 साठी नुकतीच जाहीर झालेली जागतिक एमडीआरटी क्रमवारी दर्शविते की, टाटा एआयएने सलग तिसऱ्या वर्षी भारतात सर्वाधिक एमडीआरटी पात्र सल्लागारांची नोंद केली असून, जागतिक क्रमवारीत #4 स्थान मिळविले आहे. 2,871 एमडीआरटी पात्र सल्लागारांसह, गेल्या वर्षाच्या तुलनेत 11% वाढ नोंदविली गेली असून, टाटा एआयएच्या सल्लागारांचे वाढते कौशल्य आणि सातत्यपूर्ण समर्पण याचे हे स्पष्ट निदर्शक आहे.

टाटा एआयएची खरी ओळख घडवते ती म्हणजे विविधता आणि समावेशकतेसाठी असलेली खोल वचनबद्धता. एकूण 1,343 महिला एमडीआरटी सदस्यांबरोबर, टाटा एआयएने महिला सदस्यतेच्या आधारे जागतिक क्रमवारीत टॉप 25 कंपन्यांमध्ये #7 स्थान मिळविले आहे. महिला एमडीआरटी पात्रताधारकांमध्ये 8.5% वाढ ही आर्थिक क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी टाटा एआयए सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचे स्पष्ट उदाहरण आहे, जेणेकरून ग्राहकांना विविध सल्लागारांच्या टीमकडून जागतिक दर्जाचा सल्ला मिळू शकेल.

ही उल्लेखनीय कामगिरी दर्शविते की, टाटा एआयए एमडीआरटी पात्र सल्लागारांच्या कौशल्यावर आधारित उत्तम दर्जाचा आर्थिक सल्ला देण्यासाठी वचनबद्ध आहे, जो ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि मार्गदर्शन प्रदान करतो. महाराष्ट्रात कंपनीने 191 एमडीआरटी पात्र सल्लागार, 17 कोर्ट ऑफ द टेबल (COT) आणि 5 टॉप ऑफ द टेबल (TOT) पात्र सल्लागार नोंदविले आहेत. COT पात्र सल्लागाराला एमडीआरटी पात्रतेच्या तुलनेत तीनपट विक्री करणे आवश्यक असते, तर TOT पात्र सल्लागाराला सहापट विक्री करणे आवश्यक असते.

टाटा एआयएचे चीफ डिस्ट्रीब्युशन ऑफिसर – प्रॉपायटरी बिझनेस, अ‍ॅलाइड चॅनल्स आणि एजन्सी सेल्स, अमित दवे यांनी सांगितले, “जगभरातील एमडीआरटी क्रमवारीत #4 स्थान मिळविणे आणि भारतात सलग तिसऱ्या वर्षी आघाडीवर राखणे ही आमच्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे. हा मैलाचा दगड म्हणजे आमच्या प्रीमिअर एजन्सी मॉडेलचा यशस्वी प्रवास आणि आमच्या सल्लागारांचे अथक प्रयत्न. एमडीआरटी पात्रता ही आमच्या सल्लागारांसाठी केवळ वैयक्तिक यश नव्हे, तर ग्राहकांनी टाटा एआयएवर दाखविलेला विश्वास आणि त्यांना जागतिक दर्जाचा आर्थिक सल्ला मिळतो आहे, याची खात्रीही आहे.”

तुमच्यासाठी हे महत्त्वाचे का आहे?

एमडीआरटी – आर्थिक सल्ल्याचा सुवर्ण मानदंड

एमडीआरटी सदस्यत्वाला जगभरातील जीवन विमा आणि आर्थिक सेवा व्यावसायिकांसाठी सर्वोच्च मापदंड मानला जातो. हे सल्लागार उच्चतम व्यावसायिक ज्ञान, कठोर नैतिक आचरण आणि उत्कृष्ट सेवा देण्याची सातत्यपूर्ण वचनबद्धता यांचे दर्शन घडवितात. जेव्हा तुम्ही टाटा एआयएचा सल्लागार निवडता, तेव्हा तुम्हाला खात्री असते की, तुम्हाला तुमच्या विविध गरजांनुसार सुसंगत, सर्वोत्तम आर्थिक सल्ला मिळेल, जो तुमचे वर्तमान संरक्षित करेल आणि भविष्य सुरक्षित करेल.

एमडीआरटी सल्लागार: तुमच्या आर्थिक लक्ष्यांच्या प्राप्तीसाठी मदत करणारे

टाटा एआयएचे एमडीआरटी पात्र सल्लागार फक्त जीवन विमा विकण्यापुरते मर्यादित नाहीत. ते त्यांच्या तज्ज्ञतेचा वापर करून तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मार्गदर्शन करतात, जे तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांशी जुळतात. निवृत्तीची योजना आखणे, कुटुंबाच्या भविष्याची सुरक्षा करणे किंवा गुंतवणुकीचा सर्वोत्तम उपयोग करणे, या सर्व बाबतीत तुम्हाला अनुभव आणि समर्पणावर आधारित संपूर्ण, विश्वासार्ह सल्ला मिळतो.

करिअर संधी प्रदान करणे: एमडीआरटी सल्लागार होण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

टाटा एआयए अशा व्यक्तींसाठी समर्पित आहे, ज्यांना फरक घडवायचा आहे आणि ज्यांना करिअरमध्ये यश मिळवायचे आहे. एमडीआरटी पात्रतेला प्रोत्साहन देऊन, टाटा एआयए इच्छुक आर्थिक सल्लागारांसाठी स्पष्ट आणि मजबूत करिअर मार्ग प्रदान करते. प्रीमिअर एजन्सी मॉडेलच्या माध्यमातून, टाटा एआयए उत्कृष्ट प्रतिभेची निवड आणि तिचे संवर्धन करते, तसेच त्यांना संपूर्ण प्रशिक्षण, करिअर प्रगतीची संधी आणि व्यापक डिजिटल समर्थन पुरविते.

मानव संसाधनांमध्ये केलेली ही गुंतवणूक केवळ कंपनीच्या सल्लागारांच्या नेटवर्कला मजबूत करत नाही, तर आर्थिक सेवांमध्ये अर्थपूर्ण आणि परिणामकारक करिअर शोधणाऱ्या व्यक्तींनाही यश मिळविण्याची खात्री देते. टाटा एआयएची ठोस समर्थन प्रणाली सल्लागारांना एमडीआरटी पदवी मिळविण्यासाठी आवश्यक साधने प्रदान करते, ज्याचा अर्थ अधिक कमाईची क्षमता आणि लोकांच्या आर्थिक भविष्यास सुरक्षित करण्यासाठी मदत करणारा परतावा देणारे करिअर आहे.

टाटा एआयएमध्ये एमडीआरटी सल्लागार व्यवसायाचे निकाल कसे सुधारतात

एमडीआरटी पात्र सल्लागार जीवन विमा कंपन्यांसाठी एक वेगळा फायदा देतात, कारण ते तज्ज्ञ मार्गदर्शन करतात, जे ग्राहकांना अधिक समाधानी बनवते आणि ब्रँडसाठी उच्च ग्राहक टिकवणूक सुनिश्चित करते. टाटा एआयएमध्ये आमचे एमडीआरटी सल्लागार उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि निष्ठावान ग्राहकांची पायाभरणी करतात.

वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये टाटा एआयएने पाच पर्सिस्टन्सी गटांपैकी चारमध्ये आघाडी मिळविली आहे, ज्यात महत्त्वाचा 13 वा महिना पर्सिस्टन्सी समाविष्ट आहे, जो ग्राहक निष्ठा आणि दीर्घकालीन आर्थिक स्वास्थ्याचा प्रमुख निर्देशांक आहे. पर्सिस्टन्सी म्हणजे ग्राहक त्यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण किती टक्केवारीने करतात, जे आमच्या सेवांवरील विश्वास दर्शविते.