लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक

By: Editor_Pratik

On: Friday, June 13, 2025 8:10 AM

livein
Google News
Follow Us

मुंबईतील अंधेरी परिसरात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या वडिलांची हत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली. आरोपी महिला तिच्या प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिप राहत होती. यावरून आरोपी महिला आणि तिच्या वडिलांमध्ये खडके उडायचे. या मुद्द्यावरून बुधवारी पुन्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, यामुळे संतापलेल्या आरोपी महिलेने प्रियकरासोबत मिळून वडिलांना मारहाण केली, यात ५८ वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला.

सोनाली बैत (वय, ३७) आणि महेश पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोनाली विवाहित असून तिला एक १७ वर्षीय मुलगी आणि एक १३ वर्षाचा मुलगा आहे. काही वर्षांपासून तिने पती आणि मुलांना सोडून दिले आणि पांडेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप राहायला सुरुवात केली. सोनालीचे वडील शंकर कांबळे यांनी त्यांच्या नात्याला वारंवार विरोध केला.

सोनालीने २००८ मध्ये अमोल बैतशी लग्न केले होते आणि ती २०२२ पासून पांडेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे, असे पोलिसांनी सांगितले. तिने तिचे वडील, भाऊ, पती आणि मुलांशी संबंध तोडले होते. शंकर कांबळे हे त्यांचा मुलगा राहुल यांच्यासोबत घाटकोपर पश्चिम येथे राहत होते.

दरम्यान, ११ जून रोजी शंकर यांनी पुन्हा एकदा सोनालीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, यामुळे संतापलेल्या सोनाली आणि पांडेने शंकर यांना मारहाण केली. या मारहाणीत शंकर यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राहुल यांनी एमआयडी पोलिसांना दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मृताच्या मुलीसह तिच्या प्रियकराला अटक केली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026