बापरे…! पुण्यातील ६२ वर्षीय भामट्याकडून ठाण्यातील ७३ वर्षीय महिलेची फसवणूक

By: Editor_Pratik

On: Wednesday, May 28, 2025 1:29 PM

Google News
Follow Us

बापरे…! पुण्यातील ६२ वर्षीय भामट्याकडून ठाण्यातील ७३ वर्षीय महिलेची फसवणूक

ठाणे : ‘लग्न करून सुखी आणि समृद्ध आयुष्य घडवू’, असे आमिष दाखवत पुण्यातील ६२ वर्षीय भामट्याने डोंबिवलीतील ७३ वर्षीय महिलेची तब्बल ५७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विश्रू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या हा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध सुरू असून तपासात गुंतले आहेत.

डोंबिवलीतील नाना शंकरशेठ रोड परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेला वधू-वर सूचनांच्या जाहिरातीतून आरोपीची ओळख झाली. त्यानंतर प्रेमाचे नाट्य रंगवत त्याने लग्नाचं वचन दिलं आणि पुण्यात घर घेण्याच्या कारणाने तब्बल ३५ लाख रुपये उकळले. हे पैसे घेण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रं व खोट्या पावत्यांचा वापर केला.

त्यावरच थांबत नाही, तर तो महिला राहत्या घरी काही काळ वास्तव्य करत सुमारे २० लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करून गेला. तसेच तिच्या डेबिट कार्डचा वापर करत २.४ लाख रुपयेही काढून फरार झाला.

या संपूर्ण प्रकारामुळे धक्का बसलेल्या पीडित महिलेने विश्रू नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(२), ३०५, ३३६(२)(३), ३३८ आणि ३४०(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या संदर्भात पोलीस निरीक्षक विवेक कुमुतकर यांनी सांगितले की, “सध्या आम्ही सखोल तपास करत असून आरोपीचा मागोवा घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.”

या घटनेनंतर वयोवृद्ध महिलांनी विवाहाच्या आमिषावर विश्वास ठेवताना अधिक सतर्क राहावे, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 26, 2026

June 25, 2026

June 25, 2026

June 24, 2026

June 24, 2026

June 24, 2026