Rupali Chakankar VS Rupali Thombre Patil | महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांची हकालपट्टी करावी, रूपाली ठोंबरे-पाटील यांना पद देण्याची सोशल मीडियावर मागणी

By: Editor_Pratik

On: Friday, May 23, 2025 12:07 PM

Rupali Chakankar VS Rupali Thombre Patil
Google News
Follow Us

मुंबई | वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर अनेक स्तरांवरून टीका होत असताना, आता सोशल मीडियावर त्यांच्यावर नाराजीचा जोरदार सूर उमटू लागला आहे. चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करून, त्यांच्या जागी भाजप नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांची नियुक्ती करावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.

विशेषतः मराठा समाजातील कार्यकर्ते आणि महिला वर्गाकडून चाकणकर यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात उशिरा प्रतिक्रिया देणं, संवेदनशीलतेचा अभाव, आणि पीडित कुटुंबाकडे वेळेत पोहोचण्यात झालेली ढिलाई यावरून चाकणकर यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

“अध्यक्ष या प्रोटोकॉलमधून बाहेर पडा”, अशी संतप्त मागणी करत कार्यकर्त्यांनी थेट जाब विचारल्याचे व्हिडीओ क्लिप्सही व्हायरल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांनी रूपाली ठोंबरे-पाटील यांची समाजातील सक्रियता, महिलांच्या मुद्द्यांवरील भूमिका आणि तातडीने प्रतिसाद देण्याची वृत्ती यांचे उदाहरण देत, त्यांना ही जबाबदारी देण्याची मागणी केली आहे.

रूपाली ठोंबरे, महिला अध्यक्ष, चाकणकर राजीनामा, JusticeForVaishnavi, हे हॅशटॅग सध्या ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण : या मागणीला राजकीय रंगही चढू लागला असून, भाजप समर्थक आणि मराठा समाजाचे काही नेते ठोंबरे-पाटील यांची निवड योग्य ठरेल, असे मत मांडत आहेत. तर काँग्रेस समर्थक चाकणकर यांच्या पाठिशी उभे असल्याचे दिसते.

येत्या काही दिवसांत राज्य सरकारकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026