पुणे, १२ ऑक्टोबर २०२६ : पुण्यातील कार्यालयीन जागांच्या लीजिंगमध्ये जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत वार्षिक १८ टक्के वाढ नोंदवण्यात आली. या नऊ महिन्यांत ८.८ दशलक्ष चौरस फुटांचे व्यवहार झाले, तर मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण ७.४ दशलक्ष चौरस फूट होते. २०१८ नंतरच्या पहिल्या नऊ महिन्यांतील ही सर्वाधिक लीजिंग नोंद असल्याचे नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुण्याचा देशातील आठ प्रमुख कार्यालयीन बाजारपेठांमधील एकूण लीजिंग व्यवहारांत १३ टक्के वाटा आहे. या कालावधीत पहिल्या तिमाहीत ३.१, दुसऱ्या तिमाहीत ३.५ आणि तिसऱ्या तिमाहीत २.२ दशलक्ष चौरस फुटांचे व्यवहार झाले.
जीसीसी आणि फ्लेक्स ऑफिसची वाढती मागणी
ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सने (जीसीसी) जानेवारी-सप्टेंबर २०२६ दरम्यान ३.१ दशलक्ष चौरस फूट जागा भाड्याने घेतली. मागील वर्षी हे प्रमाण १.६ दशलक्ष चौरस फूट होते. एकूण व्यवहारांमध्ये जीसीसीचा वाटा ३५ टक्के राहिला. फ्लेक्स ऑफिस ऑपरेटर्सनी २.५ दशलक्ष चौरस फूट जागा भाड्याने घेतली असून, त्यांचा वाटा २८ टक्के आहे.
दरम्यान, तिसऱ्या तिमाहीत सरासरी कार्यालयीन भाडे वार्षिक सहा टक्क्यांनी वाढून प्रति चौरस फूट प्रतिमहिना ८३ रुपये झाले. एकूण व्यवहारांपैकी ८७ टक्के व्यवहार ग्रेड-ए कार्यालयीन जागांचे होते.
नवीन बांधकामांमधून जानेवारी-सप्टेंबरदरम्यान ६ दशलक्ष चौरस फूट जागा उपलब्ध झाली. रिक्ततेचे प्रमाणही १३.५ टक्क्यांवरून १३.८ टक्क्यांपर्यंत किंचित वाढले. जीसीसीची वाढती मागणी, कुशल मनुष्यबळ आणि खर्चातील स्पर्धात्मकता यामुळे पुणे कार्यालयीन बाजारपेठ कंपन्यांसाठी आकर्षक ठरत असल्याचे नाइट फ्रँक इंडियाने म्हटले आहे.
पी. विलास मेनन, कार्यकारी संचालक, ऑक्युपायर स्ट्रॅटेजी अँडसोल्यूशन्स, इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक्स आणि कॅपिटल मार्केट्स, शाखाप्रमुख (पुणे), नाइट फ्रँक इंडिया, म्हणाले, “पुण्यातील कार्यालयीनबाजारपेठ भोगवटादारांना आकर्षित करत आहे, आणि लीजिंग 2018 नंतरच्या नऊ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. GCC हे वाढीचेप्रमुख चालक आहेत, तर फ्लेक्स ऑपरेटर्सचा उपक्रमातील वाटा लक्षणीयआहे. रिक्तता किंचित वाढली असली तरी बाजारपेठ नवीन पुरवठा सामावूनघेत आहे. पुण्यातील प्रतिभेचा साठा आणि खर्चातील स्पर्धात्मकता भारतातआपली कॅपेबिलिटी सेंटर्स स्थापन किंवा विस्तारू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठीत्याचे आकर्षण वाढवत आहे.”





