पॉपाईज इंडिया’ची पुण्यात तीन नवीन स्टोअर्स सुरू; आता पुणेकरांना मिळणार ‘‘लुइसियाना’’च्या भन्नाट चवींचा स्वाद

By: Editor_Manas

On: Wednesday, May 13, 2026 2:51 PM

Google News
Follow Us

पुणे, १३ मे २०२६ : भारतातील आघाडीची फूड सर्व्हिस कंपनी ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडने जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ‘पॉपाईज®’ या ब्रँडची पुण्यात तीन नवीन रेस्टॉरंट्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारतीय खाद्यपदार्थ बाजारपेठेत झपाट्याने विस्तार करत असलेल्या पॉपाईजने आता पुणेकरांसाठी आपल्या खास ‘लुइसियाना-स्टाइल’ चवी उपलब्ध करून दिल्या आहेत.

मे महिन्यात सुरू होणारी ही तीन रेस्टॉरंट्स विमाननगरमधील फिनिक्स मार्केट सिटी, मगरपट्टा येथील सीझन्स मॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉल येथे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक भागांमध्ये ग्राहकांना पॉपाईज सहज उपलब्ध होणार आहे.

तरुणांची मोठी संख्या, वाढता विद्यार्थीवर्ग आणि काम करणाऱ्या व्यावसायिकांचे प्रमाण यामुळे पुणे हे बाहेर खाण्याची आवड असलेल्या ग्राहकांचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. जागतिक दर्जाच्या क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (QSR) ब्रँड्सना येथे मोठी मागणी असून, पॉपाईजनेही याच पार्श्वभूमीवर पुण्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘पॉपाईज’ हा लुइसियाना येथे सुरू झालेला जागतिक ब्रँड असून, मसालेदार आणि खास चवीच्या फ्राईड चिकनसाठी तो ओळखला जातो. त्यांच्या चिकनची खास रेसिपी १२ तास मॅरिनेट केली जाते आणि त्यात विशेष कॅजून मसाल्यांचा वापर केला जातो. त्यामुळे जगभरात या ब्रँडची मोठी लोकप्रियता आहे. विशेषतः ‘पॉपाईज चिकन सँडविच’ला जागतिक स्तरावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि मुंबई येथे यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता पॉपाईज पुण्यात पदार्पण करत आहे.

ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडचे पॉपाईज ब्रँरॅप्स, काजून फ्राईज आणि क्रिस्पी अनियन रिंग्स यांसारखे पर्याय ठेवण्यात आले आहेत. विविध चवी आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हा मेन्यू तयार करण्यात आला आहे.

याशिवाय ‘डिप एन ड्रिप’ या नव्या सॉस रेंजचेही विशेडसाठीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि चीफ बिझनेस ऑफिसर विभोर गुप्ता म्हणाले, “पुण्यात पॉपाईज सुरू करण्याबाबत ग्राहकांकडून सातत्याने विचारणा होत होती. त्यामुळे पुण्यातील सुरुवातीबद्दल आम्ही उत्साहित आहोत. सुरुवातीला तीन स्टोअर्स सुरू करत असून, भविष्यात आणखी विस्ताराची योजना आहे. नवीन आणि वेगळ्या चवींचा शोध घेणाऱ्या तरुण ग्राहकांमुळे पुणे हे आमच्यासाठी मोठी क्षमता असलेले मार्केट आहे.”

पुण्यातील पॉपाईजच्या मेन्यूमध्ये ग्राहकांसाठी विविध आकर्षक पदार्थ उपलब्ध असतील. यामध्ये सिग्नेचर चिकन, स्पायसी कोरियन आणि स्वीट चिली फ्लेवर्ससह ‘हॉट अँड मेसी’ रेंजचा समावेश आहे. तसेच फ्लेवर-बर्स्ट बर्गर्स, काजून चिकन टेंडर्स, चिकन पॉपकॉर्न आणि प्रसिद्ध चिकन सँडविचही उपलब्ध असणार आहेत.

शाकाहारी ग्राहकांसाठीही फ्लेवर-बर्स्ट व्हेज बर्गर्स, ष आकर्षण असणार आहे. चार वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध असलेले हे सिग्नेचर सॉस १०० मि.ली. आणि ३०० मि.ली. पॅकमध्ये ग्राहकांना मिळणार आहेत. पदार्थांसोबत डिप करून किंवा मिसळून खाता यावे, तसेच सहज शेअर करता यावे, यासाठी ही संकल्पना सादर करण्यात आली आहे.

“वर्ल्ड फेमस चिकन, लव्हड बाय मिलियन्स… पुण्यात पॉपाईज!” या घोषवाक्यासह पॉपाईज पुण्यात प्रवेश करत असून, स्थानिक ग्राहकांशी मजबूत नाते निर्माण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. या निमित्ताने पुणेकरांसाठी दोन आठवड्यांची विशेष प्रारंभी ऑफरही जाहीर करण्यात आली आहे.

या विस्तारामुळे पॉपाईज भारतातील प्रमुख शहरांमध्ये आपले जाळे अधिक मजबूत करत असून, पुण्यातही ठोस स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now