इंडियन रेड क्रॉस सोसायटी तर्फे पुण्यात फिजिओथेरपी विभाग सुरू

By: Editor_Manas

On: Saturday, May 9, 2026 3:31 PM

Google News
Follow Us

पुणे, मे 2026 : इंडियन रेड क्रॉस सोसायटी,पुणे शाखेतर्फे 8 मे वर्ल्ड रेड क्रॉस डे निमित्त कॅम्प येथील रेड क्रॉस हाऊस येथे नवीन फिजिओथेरपी विभागाचे उद्घाटन करण्यात आले. रूग्ण व नागरिकांना सुलभ आणि किफायतशीर दरात फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

वर्ल्ड थॅलेसेमिया डे आणि वर्ल्ड रेड क्रॉस डे निमित्त युनायटेड इन ह्युमॅनिटी या संकल्पनेअंतर्गत हा उद्घाटन सोहळा पार पडला.या कार्यक्रमाला सदस्य,आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक,स्वयंसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी सामुदायिक आरोग्य सेवा अधिक मजूबत करण्याच्या दिशेने संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक केले.  

मानवतावादी कार्य, रक्तदान,आरोग्याबाबत जनजागृती याबरोबरच वेळेवर केली जाणारी तपासणी आणि समुपदेशनाद्वारे थॅलेसेमिया प्रतिबंधाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.यावेळी पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या हितासाठी आरोग्यविषयक सहाय्य उपक्रमांचा विस्तार करण्याची संस्थेची कटिबद्धता व्यक्त केली. 

या कार्यक्रमाला इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ.विक्रम फाटक,उपाध्यक्ष मॅब्रिन नानावटी,मानद सचिव डॉ.आर.व्ही.कुलकर्णी आणि व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026