एनआयआयटी युनिव्हर्सिटीकडून २०२६ साठी प्रवेश प्रक्रिया जाहीर

By: Editor_Manas

On: Wednesday, May 13, 2026 3:58 PM

Google News
Follow Us

पुणे, मे १३, २०२६: ज्ञान-आधारित समाजातील उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये उच्‍च शिक्षण आणि अध्ययनात नाविन्यता आणण्याच्या दृष्टीकोनातून स्थापन झालेल्या आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीची १५ वर्षे पूर्ण करणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफ द फ्युचर म्हणजेच एनआयआयटी युनिव्हर्सिटी (एनयू) (NIIT University (NU)) ने वर्ष २०२६ प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. विद्यार्थी आता सीयूईटी(CUET)इपमैट (IPMAT) आणि एमएचटी सीईटीच्या (MHT CET) गुणांच्या आधारे अर्ज करू शकतात. या गुणांमुळे विद्यार्थ्यांना एनयूएटी (एनआयआयटी युनिव्हर्सिटीची अॅप्टिट्यूड टेस्‍ट) मधून सवलत मिळेल आणि ते जवळपास १०० टक्‍क्‍यांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवू शकतात. एनयू सीयूईटी गुणांना मान्यता देणारी आघाडीच्या खाजगी युनिव्‍हर्सिटी आहे. अलिकडच्या वर्षांत २,००,००० हून अधिक सीयूईटी उमेदवारांनी एनयूला आपली पसंती दर्शवली आहे.

विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या विद्याशाखेसाठी अर्ज करताना सीयूईटीइपमैट आणि एमएचटी सीईटीचे स्कोअरकार्ड अपलोड करू शकतात आणि त्यांच्या पात्रतेनुसार शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. युनिव्‍हर्सिटी विद्यार्थ्‍यांना भविष्यातील कामाच्या स्वरूपाशी सुसंगत कौशल्‍यांसह सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासक्रम उपलब्ध करून देते, जसे बीटेक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, बीटेक सायबर सिक्‍युरिटीबीटेक रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, बीटेक बायोटेक्‍नॉलॉजी, बीटेक कॉम्प्युटर सायन्स अँडइंजिनिअरिंग, आणि बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड म्युनिकेशन इंजिनिअरिंग. विद्यार्थी १२वी नंतर ३-वर्षांचा बीबीए, बीबीए आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बीबीए बिझनेस अॅनालिटिक्स आणि ५-वर्षांचा इंटिग्रेटेड मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (आयएमबीएप्रोग्रामची निवड करू शकतात.

या प्रवेश प्रक्रियेबाबत मत व्‍यक्त करत एनआयआयटी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. प्रकाश गोपालन म्हणाले, एनआयआयटीयुनिव्हर्सिटीमध्ये आम्ही देशभरातील महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि विद्यार्थी-अनुकूल करण्यासाठी टिबद्ध आहोत. सीयूईटीइपमैट आणि एमएचटी सीईटीचे गुण स्वीकारून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सोपी करणे आणि या स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांचा सन्मान करणे, हा आमचा उद्देश आहे. या पद्धतीमुळे पात्र उमेदवारांना एनयूएटी परीक्षेमधून सवलत मिळू शकते आणि ते प्रत्‍यक्ष पर्सनल इंटरअॅक्शन फेरीकडे वळू शकतात. आमचा अशा प्रेरित विद्यार्थ्यांना लवकर शोधण्‍याचा आणि त्यांना उत्तम शैक्षणिक दर्जा, उद्योगांचा अनुभव  अनुभवात्मक शिक्षण देणारे वातावरण उपलब्ध करून देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे ते भविष्यासाठी सज्ज करिअर घडवू शकतील.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 13, 2026

May 13, 2026

May 13, 2026

May 13, 2026

May 12, 2026

May 12, 2026