एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!

By: Editor_Manas

On: Tuesday, May 12, 2026 4:59 PM

Google News
Follow Us

पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर, पुणे येथील स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगचा (एसओसी) विद्यार्थी तेजस मनोज पाटील याची चीनमधील शांघाय येथे १५ ते १७ मे २०२६ दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही निवड भारतीय तलवारबाजी संघटनेतर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील अव्वल फेन्सर्स सहभागी होणार आहेत. फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवड अधिसूचनेनुसार, तेजस मनोज पाटील याची भारतीय पुरुष ‘फॉइल’ संघात निवड करण्यात आली आहे. तेजस पाटीलने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरी, मेहनत आणि खेळातील उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या यशाची नोंद पुन्हा अधोरेखित झाली आहे. या कामगिरीनंतर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डाॅ.सुनिता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डाॅ.सायली गणकर, प्र.कुलपती डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, डाॅ.नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, छत्रपती शिवाजी पुरस्कारप्राप्त क्रीडा विभाग संचालक प्रा. पद्माकर फड यांनी तेजसचे अभिनंदन करत शांघाय येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या कामगिरीमुळे विद्यापीठातील तसेच राज्यातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 12, 2026

May 12, 2026

May 12, 2026

May 12, 2026

May 12, 2026

May 12, 2026