‘इंडसइंड जनरल इन्शुरन्स’ची ‘+1 इन युवर मदरहूड जर्नी’ जाहिरात सादर

By: Editor_Manas

On: Thursday, May 14, 2026 4:38 PM

Google News
Follow Us

भारत, 14 मे २०२६ : ‘इंडसइंड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.’ने (पूर्वाश्रमीची रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड) मदर्स डेनिमित्त ‘+1 इन युवर मदरहूड जर्नी’ ही जाहिरात सादर केली आहे. मातृत्वाची सुरुवात बाळाच्या जन्मापासून होत नाही, तर एखादी महिला आई होण्याचा निर्णय घेते त्या क्षणापासूनच तिचा मातृत्वाचा प्रवास सुरू होतो, हा महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा या जाहिरातीतून मांडण्यात आला आहे.

आजच्या काळात प्रजनन उपचार घेणे हा आधुनिक कुटुंब उभारणीचा महत्त्वाचा भाग बनला आहे. अशा वेळी गर्भधारणेपूर्वी महिलांना भावनिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवर ज्या अनुभवांना सामोरे जावे लागते, त्यावर या जाहिरातीत संवेदनशीलपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. मातृत्वाच्या अनेकदा न दिसणाऱ्या या भावनिक टप्प्याकडे लक्ष वेधत, इंडसइंड जनरल इन्शुरन्सने मातृत्वाबद्दलची सामाजिक धारणा अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला असून, या संपूर्ण प्रवासात महिलांसोबत भागीदार म्हणून उभे राहण्याची भूमिका व्यक्त केली आहे.

प्रजनन उपचार केंद्राच्या पार्श्वभूमीवर साकारलेला हा एक संवेदनशील लघुपट आहे. शांत आणि सूक्ष्म कथनशैलीतून एका महिलेचा भावनिक प्रवास यात उलगडला जातो. उपचार केंद्राच्या प्रतीक्षालयात ती बसलेली असताना, तिच्या आसपासची इतर जोडपी पालकत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाताना तिला दिसतात.

अतिरिक्त संवादांचा आधार न घेता, आशा, संयम आणि जिद्द या भावनांचा गुंतागुंतीचा अनुभव या चित्रपटात अत्यंत हळुवारपणे मांडण्यात आला आहे. सहाय्यक प्रजनन प्रक्रियेतून जाणाऱ्या महिला आणि कुटुंबांच्या भावना अतिशय वैयक्तिक असतात; मात्र त्याविषयी अनेकदा उघडपणे बोलले जात नाही. हेच न बोलले जाणारे भावविश्व या चित्रपटातून प्रभावीपणे समोर आणण्यात आले आहे. https://www.youtube.com/watch?v=3u0sdGrIbeg

ब्रँडची क्रिएटिव्ह एजन्सी भागीदार ‘सोचीअर्स’ यांनी या जाहिरातपटाची संकल्पना मांडून त्याची निर्मिती केली आहे. आधुनिक मातृत्वाच्या प्रवासातील भावनिक बारकावे संवेदनशील आणि वास्तववादी शैलीत मांडण्याचा प्रयत्न या जाहिरातपटाच्या कथनातून प्रभावीपणे दिसून येतो.

भारतामध्ये अंदाजे १.४६ कोटी जोडपी प्रजननासंबंधी अडचणींना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत ही जाहिरात आयव्हीएफसारख्या सहाय्यक प्रजनन प्रक्रियांकडे संवेदनशीलपणे लक्ष वेधते. सामाजिक संकोच, भावनिक ताण आणि मोठा आर्थिक खर्च यांमुळे या प्रवासातील अनुभव अनेकदा मनातच दडून राहतात. या अनुभवांना वास्तववादी आणि संवेदनशील पद्धतीने मुख्य प्रवाहात आणत, प्रजनन आणि पालकत्वाविषयी अधिक मोकळेपणाने संवाद व्हावा, यासाठी इंडसइंड जनरल इन्शुरन्स प्रयत्न करत आहे. तसेच, पारंपरिक चौकटींपलीकडे जाऊन पालकत्वाचा मार्ग निवडणाऱ्या जोडप्यांच्या धैर्यालाही ही जाहिरात आदरपूर्वक समोर आणते.

हा जाहिरातपट यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि लिंक्डइन यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मातृत्वाचा प्रवास हा केवळ भावनिक नसून आर्थिक आणि वैद्यकीयदृष्ट्याही आव्हानात्मक असतो, याची जाणीव ठेवून इंडसइंड जनरल इन्शुरन्सने ग्राहकांना या संपूर्ण प्रवासात मदत करणाऱ्या विमा योजना उपलब्ध करून दिल्या आहेत.

कंपनीच्या आरोग्यविमा योजनांमध्ये आयव्हीएफ, आययूआय आणि भ्रूण प्रत्यारोपण यांसारख्या वंध्यत्व उपचारांचा समावेश आहे. याशिवाय मातृत्वाशी संबंधित खर्च, गर्भधारणेपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी, तसेच नवजात बाळांसाठी जन्माच्या पहिल्या दिवसापासून वैद्यकीय उपचार आणि लसीकरणाचे सर्वसमावेशक संरक्षणही या योजनांमध्ये दिले जाते. त्यामुळे मातृत्वाच्या पहिल्या टप्प्यापासून ते बालकाच्या सुरुवातीच्या वाढीपर्यंत आवश्यक तो आधार मिळतो.

या जाहिरातीबाबत बोलताना ‘इंडसइंड जनरल इन्शुरन्स’चे प्रेसिडेंट आणि डिजिटल बिझनेस, मार्केटिंग व स्ट्रॅटेजी विभागाचे प्रमुख तरूण खन्ना म्हणाले, “मातृत्वाची ओळख एखाद्या एका क्षणाने ठरत नाही. ती एका निर्णयापासून सुरू होते आणि त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यासोबत विकसित होत जाते. ‘+1 इन युवर मदरहूड जर्नी’ या चित्रपटातून आम्ही मातृत्वाच्या या संपूर्ण प्रवासाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्यांचाही सन्मान करू इच्छितो. इंडसइंड जनरल इन्शुरन्समध्ये आमचा प्रयत्न ग्राहकांच्या गरजांनुसार पुढे जाणाऱ्या उपाययोजना उपलब्ध करून देण्याचा आहे. केवळ विमा संरक्षणच नव्हे, तर पालकत्वाच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास आणि मानसिक आधार देण्याचाही आमचा उद्देश आहे. यापुढेही प्रत्येक पालकाला त्याच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर काळजी, संरक्षण आणि आत्मविश्वास देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.”

आधुनिक मातृत्वाच्या भावनिक, वैद्यकीय आणि आर्थिक पैलूंना समजून घेत, ही जाहिरात ग्राहकांच्या बदलत्या गरजांप्रती असलेली संवेदनशीलता आणि उपयुक्त उपाययोजना देण्याची इंडसइंड जनरल इन्शुरन्सची भूमिका स्पष्ट करते. कुटुंबांना केवळ आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवरच नव्हे, तर त्या टप्प्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या संपूर्ण प्रवासात साथ देण्याचा कंपनीचा प्रयत्न या जाहिरातीतून दिसून येतो.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 14, 2026

May 14, 2026

May 14, 2026

May 14, 2026

May 14, 2026

May 14, 2026