‘भारत फोर्ज’चा ‘एमब्रेअर’शी लँडिंग गिअर फोर्ज्ड घटकांच्या उत्पादनासाठी दीर्घकालीन करार; एअरोस्पेस क्षेत्रात मोठी कामगिरी

By: Editor_Manas

On: Tuesday, May 12, 2026 12:03 PM

Google News
Follow Us

पुणे, मे २०२६ : भारत फोर्ज लि. (बीएफएल) या प्रगत फोर्जिंग आणि अचूक अभियांत्रिकी क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने एमब्रेअर या आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत दीर्घकालीन करार केला आहे. या कराराअंतर्गत भारत फोर्ज कंपनी लँडिंग गिअरसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या फोर्ज्ड (घडवलेल्या धातूच्या) भागांचे उत्पादन आणि पुरवठा करणार आहे. फोर्ज्ड घटकांसाठी ‘एमब्रेअर’च्या जागतिक एअरोस्पेस पुरवठा साखळीत सहभागी होणारी भारत फोर्ज ही भारतातील पहिली पुरवठादार कंपनी ठरली आहे.

या करारानुसार, ‘एमब्रेअ’रच्या व्यावसायिक आणि संरक्षक विमानांच्या लँडिंग गिअर सिस्टीमसाठी उच्च दर्जाचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे फोर्ज्ड घटक भारत फोर्ज ही कंपनी पुरवेल. या करारामुळे जागतिक विमान उद्योगातील पुरवठा साखळीत ‘भारत फोर्ज’चा सहभाग वाढणार आहे. त्याचप्रमाणे जटिल आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून ‘भारत फोर्ज’ची भूमिका अधिक मजबूत होणार आहे.

गुणवत्ता, विश्वासार्हता आणि सातत्यपूर्ण सहकार्य यांबाबतची दोन्ही कंपन्यांची मजबूत बांधिलकी या दीर्घकालीन करारातून स्पष्ट होते. तसेच, भारत फोर्ज लि. ही कंपनी कठोर जागतिक प्रमाणन मानकांना अनुरूप असलेली उच्च दर्जाची फोर्ज्ड उत्पादने तयार करण्याची क्षमता राखून आहे, हेही या करारातून ठळकपणे दिसून येते.

‘भारत फोर्ज’चे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, “बीएफएल ही ‘एमब्रेअर’साठी फोर्ज्ड घटक पुरवणारी पहिली भारतीय कंपनी ठरणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या एअरोस्पेस व्यवसायात आम्ही विकसित केलेल्या क्षमतांचे हे प्रतीक आहे. आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही ‘एमब्रेअर’चे आभार मानतो. पुढील काळात या भागीदारीत अधिक वाढ करून त्यात अधिक मूल्य निर्माण होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. हा करार महत्त्वाच्या संरचनात्मक घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमता निर्माण करण्यास मदत करेल. त्यामुळे एअरो इंजिन घटकांच्या क्षेत्रात तयार झालेल्या आमच्या क्षमतेला अधिक बळ मिळेल.”

भारतातील एखाद्या कंपनीसोबत झालेला ‘एमब्रेअर’चा हा पहिलाच करार आहे. भारतातील एअरोस्पेस उद्योग व्यवस्था विकसित करण्याच्या एमब्रेअरच्या बांधिलकीचे हे प्रतीक आहे. यामुळे संपूर्ण पुरवठा साखळीत दीर्घकालीन मूल्य निर्माण होण्यास मदत होणार आहे. एमब्रेअर भारतात आपली उपस्थिती हळूहळू वाढवत आहे आणि स्थानिक उद्योगातील नेते तसेच सरकारी भागधारकांशी सतत संवाद साधत आहे. अशा महत्त्वाच्या वेळी हा करार झाल्याने त्याचे महत्त्व मोठे आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now