७ मार्चला सूर्यदत्त ग्रुपतर्फे महिला आरोग्य तपासणी उपक्रम

By: Editor_Manas

On: Wednesday, March 4, 2026 3:10 PM

Google News
Follow Us

पुणे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सतर्फे येत्या शनिवारी (ता. ७) बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या मानसिक व शाररिक आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी १८ वर्षांवरील सर्व युवक, पुरुष व महिलांसाठी विनामूल्य कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम आयोजिली आहे. एज्यु-सोशियो हेल्थ इनिशिएटिव्ह अंतर्गत ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये हे तपासणी व जनजागृती शिबिर होणार असून, मुळशी तालुक्यातील सर्व नागरिकांनी चांगल्या आरोग्यासाठी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे व निरोगी जीवनशैली अंगीकारावी.

साईधाम कॅन्सर चॅरिटेबल हॉस्पिटल व डॉ. माने मेडिकल फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजिला आहे. साईधाम कँसर चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक व साईधाम मॉडेल ऑफ कँसर केअरचे प्रवर्तक डॉ. स्वप्नील माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘साई संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स’च्या माध्यमातून ही कर्करोग तपासणी होणार आहे. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते दोनवेळा उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच आजवर साईधाम हॉस्पिटलच्या वतीने १४०० हुन अधिक आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली असून, त्याद्वारे लाखो रुग्णांना तपासणी व मार्गदर्शन मिळाले आहे, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी दिली.

फिजिओथेरपी, फार्मसी, नर्सिंग व हॉस्पिटॅलिटी या विभागातील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. कॅन्सरच्या लक्षणांची त्वरित ओळख आणि प्रतिबंधावर भर देऊन, तोंडाचा कॅन्सर (ओरल कॅन्सर), स्तन कॅन्सर (ब्रेस्ट कॅन्सर) आणि गर्भाशय विकार (यूटराइन डिसऑर्डर्स) याबाबत जागृती निर्माण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन राबविण्यात येत आहे. या शिबिरात सहभागी सर्वांना मोफत तपासणी आणि परीक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे वेळेवर आरोग्य तपासणी होऊन त्यावर योग्य ते मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने शक्य होऊ शकेल, असे आयोजकांनी म्हटले आहे.

कर्करोग तपासणीसोबतच सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स येथील फिजिओथेरपी विभागाच्या तज्ज्ञांकडून स्नायू व अस्थिसंस्थेचे आरोग्य, पुनर्वसनाची गरज तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना यांसंदर्भात सविस्तर फिजिओथेरपी तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सहभागी नागरिकांना सर्वांगीण आरोग्य तपासणीचा लाभ मिळणार आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा व सर्वांगीण आरोग्य संवर्धनावर विशेष भर दिला जाणार आहे.

एज्यु-सोशियो हेल्थ इनिशिएटिव्ह हा उपक्रम शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांना जोडणारा दुवा आहे. या शिबिराच्या माध्यमातून समाजाला ज्ञानाची जोड आणि संवेदनशील आरोग्यसेवा देत सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्करोग तपासणी, फिजिओथेरपी आणि महिलांसाठी विशेष आरोग्यसेवा यांचे एकत्रीकरण करून आम्ही समुदायाच्या सर्वांगीण आणि शाश्वत आरोग्यविकासाचा एक उपक्रम हाती घेतला आहे, असेही संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया यांनी नमूद केले.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये शनिवारी (ता. ७) सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या या कर्करोग व फिजिओथेरपी तपासणी शिबिराचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा. विनामूल्य नाव नोंदणीसाठी आपलं पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक ७२६२ ०११३३८, ७२६२०११७७४ यावर व्हाट्सअप करावे, असे आवाहन प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांनी केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026