राजस्थान रॉयल्सचा मुख्य भागिदार म्हणून ‘वारी एनर्जीजची’ दमदार एन्ट्री!

By: Editor_Manas

On: Thursday, March 19, 2026 8:05 AM

Google News
Follow Us

राष्‍ट्रीयमार्च २०२६: भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील वाढ आणि देशातील प्रमुख क्रीडा व्यासपीठ यांना एकत्र आणत वारी एनर्जीज लिमिटेड (बीएसई कोड: ५४४२७७एनएसमई: WAAREEENERया जागतिक ऊर्जा संक्रमण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्ससोबत मुख्य भागिदार म्हणून हातमिळवणी केली आहे. या भागीदारीअंतर्गत, वारी एनर्जीजचा लोगो संपूर्ण हंगामात राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत मॅचडे जर्सी आणि ट्रेनिंग किटच्या दर्शनी भागावर ठळकपणे झळकणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि वारी एनर्जीज यांच्यातील ही भागीदारी नवकल्पना आणि शाश्वतता या मूल्यांशी बांधील असलेल्या दोन ब्रँड्सना एकत्र आणते. खेळाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा दोन्ही संस्थांचा समान दृष्टिकोन आहे.

१९९० मध्ये स्थापन झालेली वारी एनर्जीज कंपनी भारताला स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेकडे नेण्यात आघाडीवर राहिली आहे. देशांतर्गत बाजारपेठेसह २५ हून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भक्कम उपस्थिती असलेली ही कंपनी उद्योग आणि समुदायांना मोठ्या प्रमाणावर अक्षय ऊर्जा उपाय स्वीकारण्यास सक्षम करत आहे.

वारी एनर्जीजचे सीएमडी हितेश दोशी म्हणाले, “भारतामध्ये क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर तो लाखो लोकांना जोडणारी आणि प्रेरित करणारी एक प्रभावी सांस्कृतिक शक्ती आहे. राजस्थान रॉयल्ससोबतची आमची भागीदारी आम्हाला स्वच्छ ऊर्जेचा संदेश उद्योग क्षेत्रातून थेट देशातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची संधी देते. वारीमध्ये आम्ही मानतो की¸ ऊर्जा संक्रमण सर्वसमावेशक, प्रेरणादायी आणि प्रत्येक भारतीयाला दिसणारे असले पाहिजे. ही भागीदारी आमच्यासाठी अभिमानाचा टप्पा आहे. भारत स्वच्छ ऊर्जेमध्ये जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असताना, हा प्रवास उद्योगापुरता मर्यादित न राहता लोकांची चळवळ बनणे आवश्यक आहे. राजस्थान रॉयल्सचा जागतिक चाहतावर्ग आणि समाजकेंद्रित दृष्टिकोन आमच्या या ध्येयाला अधिक बळ देतो. आम्ही एकत्र येऊन केवळ एका टीमला पाठिंबा देत नाही आहोत, तर भारताचा हरित आणि अधिक शाश्वत भविष्याकडे जाणारा प्रवास वेगवान करण्याच्या एका मोठ्या उद्दिष्टाचे समर्थन करत आहोत.”

राजस्थान रॉयल्सचे सीओओ आलोक चित्रे म्हणाले, “मुख्य भागिदार म्हणून वारी एनर्जीजचे रॉयल्स कुटुंबात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. क्रिकेटच्या माध्यमातून समाजात बदल घडवण्याच्या आणि नवकल्पनांद्वारे क्रिकेटला पुढे नेण्याच्या आमच्या विचारसरणीशी ही भागीदारी पूर्णपणे सुसंगत आहे. जागतिक ऊर्जा संक्रमणात वारीचे नेतृत्व आणि आमचा उद्देशपूर्ण, भविष्याभिमुख संघ उभारण्याचा दृष्टिकोन यांमध्ये उत्तम समन्वय आहे. एकत्रितपणे आम्ही क्रीडा, नवकल्पना आणि उद्देशपूर्ण भागीदारी यांचा संगम घडवून नवे मानक प्रस्थापित करू इच्छितो. तसेच, या सहयोगाच्‍या माध्‍यमातून चाहत्यांशी अधिक प्रभावी संवाद साधत आणि समुदायांमध्ये सकारात्मक परिणाम घडवत, मैदानाबाहेरही एक दृढ वारसा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

ही भागीदारी वारीच्या सौर मॉड्यूल्स आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील जागतिक अनुभवाला प्रत्यक्ष पातळीवर परिणामकारक स्वरूप देण्यास गती देईल. तसेच, क्रिकेटच्या माध्यमातून समाजातआणि नवोन्मेषाच्या माध्यमातून क्रिकेटमध्‍ये बदल घडवून आणणे या राजस्थान रॉयल्सच्या ध्येयाच्या केंद्रस्थानी राहून समाजात सकारात्मक बदल घडवण्यास मदत करेल.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 19, 2026

March 19, 2026

March 19, 2026

March 19, 2026

March 19, 2026

March 19, 2026