राष्ट्रीय, ३० मार्च २०२६: अपोलो हॉस्पिटल्सने ‘रुग्ण वाहतूक सुविधेबाबत’ एक विशेष उपक्रम सुरु करत असल्याची घोषणा आज केली आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध भागीदारांसोबत समन्वय साधून हवाई वैद्यकीय वाहतुकीद्वारे गंभीर स्थितीतील रुग्णांना प्रगत आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध करून दिल्या जाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही महिन्यांत, अपोलो हॉस्पिटल्सने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एअर ॲम्ब्युलन्स कंपन्यांसोबत करार केले आहेत. यामुळे तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आता अधिक सोपे आणि सुरक्षित होईल. ही सर्व सेवा अपोलोच्या ‘१०६६ इमर्जन्सी रिस्पॉन्स नेटवर्क’ द्वारे चालवली जाईल. या अंतर्गत सर्व सेवा पुरवठादारांना एकत्र आणून रुग्णांची वाहतूक वेगाने आणि सुव्यवस्थित पद्धतीने करणे शक्य होईल. अपोलो हॉस्पिटल्सच्या या नवीन भागीदारीमुळे आपत्कालीन वैद्यकीय प्रवासात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. दुर्गम किंवा लांबच्या ठिकाणाहून रुग्णांना आणताना होणारा विलंब, जास्त खर्च आणि मध्यस्थांची गरज आता कमी होईल. या नव्या उपक्रमामुळे रुग्णांची हवाई वाहतूक सेवा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होणार आहे.
एअर ॲम्ब्युलन्स सेवा आता अधिक प्रगत आणि अधिक विस्तृत केल्याबाबत, अपोलो हॉस्पिटल्सच्या उपाध्यक्ष डॉ. प्रीता रेड्डी म्हणाल्या: “गंभीर परिस्थितीतील रुग्णाला, योग्य वेळी योग्य रुग्णालयात पोहोचवणे हे जीव वाचवण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरते. नामवंत एअर ॲम्ब्युलन्स पुरवठादारांशी केलेल्या हातमिळवणीमुळे, आता रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना प्रगत उपचार मिळवणे अधिक सोपे झाले आहे. ही सेवा केवळ शहरांपुरती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरही अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित पद्धतीने उपलब्ध असेल. आमच्या ‘१०६६’ रिस्पॉन्स नेटवर्कच्या मदतीने रुग्णांना उपचारांचे उत्तम नियोजन आणि रुग्णालयाची पूर्वतयारी अशा दोन्ही सुविधा मिळतील. यामुळे रुग्णांना हव्या त्या वेळी आवश्यक उपचार मिळण्यासाठी एक सुरक्षित आणि खात्रीशीर मार्ग तयार झाला आहे.”
पहिल्या टप्प्यात, अपोलो हॉस्पिटल्सने देश-विदेशातील रुग्णांच्या वाहतुकीसाठी अनेक एअर ॲम्ब्युलन्स सेवा पुरवठादारांशी करार केले आहेत. यामध्ये ब्ल्युडॉट चार्टर्स अँड एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस (युएई), एरोमेड इंटरनॅशनल रेस्क्यू सर्व्हिसेस प्रा. लि., झंकार एव्हिएशन प्रा. लि., iCATT हेल्थ सोल्युशन्स प्रा. लि., एअर रेस्क्युअर्स वर्ल्ड वाइड प्रा. लि., वेदांत एअर रेस्क्यू प्रा. लि., एरोकेअर एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, आयुसेवा एअर अँड ट्रेन





