मर्सिडीज-बेंझची नवीन V-Class LWB; भारतातील लक्झरी प्रवासाला नवी व्याख्या

By: Editor_Manas

On: Wednesday, March 4, 2026 3:39 PM

Google News
Follow Us

मुंबई : लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझने ‘प्रायव्हेट सूट ऑन व्हील्स’ या संकल्पनेवर आधारित नवीन V-Class एक्स्ट्रा लाँग व्हीलबेस (LWB) मॉडेलचे भारतात अनावरण केले. प्रशस्त जागा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाचा आराम यांचा संगम असलेली ही गाडी भारतातील वैयक्तिक लक्झरी दळणवळण क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरणार आहे. या मॉडेलची भारतातील एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत 1.4 कोटी रुपये असून V300d (डिझेल) आणि V300 (पेट्रोल) या दोन पर्यायांमध्ये ती उपलब्ध आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर यांनी सांगितले की, भारतीय ग्राहकांसाठी पूर्णपणे नवीन V-Class सादर करताना कंपनीला आनंद होत आहे. ही गाडी लक्झरी, प्रशस्त जागा आणि वैयक्तिक गोपनीयता यांचा उत्कृष्ट अनुभव देणारी असून भारतातील संपन्न ग्राहक आणि ट्रेंडसेटर्सच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. तसेच V-Class चे स्थानिक उत्पादन भारतात सुरू करण्याचा निर्णय कंपनीची भारताबद्दलची बांधिलकी अधिक दृढ करतो, असेही त्यांनी नमूद केले.

नवीन V-Class एक्स्ट्रा लाँग व्हीलबेस (5,370 मिमी लांबी, 3,430 मिमी व्हीलबेस) कॉन्फिगरेशनसह अत्याधुनिक 6-सीट लेआउटमध्ये सादर करण्यात आली आहे. भारतात प्रथमच या मॉडेलमध्ये पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. यात AIRMATIC एअर सस्पेन्शन देण्यात आले असून ते विशेषतः भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे.

या वाहनात पेट्रोल (170 kW / 228 bhp + 15 kW माइल्ड हायब्रिड) आणि डिझेल (174 kW / 233 bhp) असे दोन पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध असून त्यासोबत 9G-TRONIC ट्रान्समिशन दिले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या वाहनात 7 स्टँडर्ड एअरबॅग्ज, ॲक्टिव्ह डिस्टन्स असिस्ट डिस्ट्रॉनिक, ॲक्टिव्ह लेन कीपिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, 360° कॅमेरा आणि ड्रायव्हर अटेंशन कॅमेरा यांसारखी अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

V-Class मध्ये AMG Line एक्स्टेरिअर, तीनही रांगांमध्ये मसाज आणि व्हेंटिलेशनसह लक्झरी सीट्स, मल्टिबीम एलईडी हेडलॅम्प्स, Burmester सराउंड साउंड सिस्टम आणि AIRMATIC एअर सस्पेन्शन यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे व्हेंटिलेटेड थर्ड-रो सीट्स देणारे हे आपल्या सेगमेंटमधील पहिले वाहन ठरले आहे.

गाडीच्या आतील भागात दुसऱ्या रांगेत फर्स्ट-क्लास स्वतंत्र लक्झरी सीट्स, 3-स्टेज व्हेंटिलेशन, मसाज फंक्शन, काल्फ सपोर्ट, वायरलेस चार्जिंग आणि कपहोल्डर्स देण्यात आले आहेत. तिसऱ्या रांगेत व्हेंटिलेटेड सीट्स, 3-पॉइंट सीट बेल्ट, ISOFIX चाइल्ड सीट अँकरज आणि USB चार्जिंग पोर्ट्स देण्यात आले आहेत. पुढील रांगेत इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड सीट्स देऊन चालक आणि सहप्रवाशांसाठीही आरामदायी अनुभव देण्यात आला आहे.

केबिनमध्ये 64-कलर अॅम्बियंट लाइटिंग, Dolby Atmos सह Burmester सराउंड साउंड (15 स्पीकर्स, 640 W), THERMOTRONIC ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हीट-इन्सुलेटिंग ग्लास आणि ENERGIZING Comfort वेलनेस मोड्स यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे प्रवास अधिक आलिशान आणि शांत बनतो.

नवीन V-Class साठी बुकिंग सुरू झाले असून 5 लाख रुपयांत बुकिंग करता येणार आहे. तसेच विद्यमान मर्सिडीज-बेंझ ग्राहकांना वितरणात प्राधान्य दिले जाणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026