महेश इंडस्ट्रियल ग्रुपकडून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान

By: Editor_Manas

On: Monday, March 9, 2026 7:21 AM

Google News
Follow Us

पुणे : उद्योग, नवसंकल्पना आणि सामाजिक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी महेश इंडस्ट्रियल ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील पी.वाय.सी. हिंदू जिमखाना येथे उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजक आणि मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील झंवर समूहाचे कार्यकारी संचालक नीरज झंवर उपस्थित होते. त्याच बरोबर जितेंद्र लखोटिया, श्यामसुंदर भुताडा, सागर राठी उपस्थित होते. उद्योग, व्यवसाय, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

यावर्षी ‘उत्कृष्ट उद्योजक’ ईश्वर लढ्ढा, ‘उत्कृष्ट उद्योजिका’ दीपिका माहेश्वरी ‘सर्वोत्तम व्यावसायिक कार्यकारी’ आशिष भट्टाड,  ‘सर्वोत्कृष्ट नवोन्मेष पुरस्कार’ रिशभ तोतला, नेक्स्ट जेन बिझनेस लेगसी पुरस्कार कुश राठी, ‘उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार’ पुणे येथील आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त पुनित डागा यांना प्रदान करण्यात आला. सर्व मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे नीरज झंवर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उद्योग क्षेत्रात यश मिळविण्यासाठी केवळ भांडवल पुरेसे नसते; त्यासाठी दूरदृष्टी, सातत्यपूर्ण परिश्रम आणि समाजाप्रती असलेली बांधिलकीही आवश्यक असते. आज सन्मानित झालेली व्यक्तिमत्त्वे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. अशा प्रकारचे सन्मान सोहळे उद्योजकतेला चालना देतात आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास मदत करतात.

या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनात  पुरस्कार समिती रश्मी भट्टड, रितू डालिया, कीर्ती लखोटिया, आशिष डालिया, निलेश लद्दड, नेहा लद्दड, कोहिनूर इंदाणी, नीरज मंत्री, उमेश धूत, अश्विन चांडक, मनीष राठी, प्रदीप राठी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारा हा सोहळा पुण्यातील उद्योगविश्वासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरला, असे आयोजकांनी सांगितले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026