भारताच्या विद्युत गतिशीलतेचे भविष्य घडवणाऱ्या अभियंत्यांना लॉरिट्झ नुडसेनचे समर्थन

By: Editor_Manas

On: Thursday, March 19, 2026 8:33 AM

Google News
Follow Us

मुंबई, मार्च 2026: भारतातील विद्युत आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रणी कंपनी असलेल्या ‘लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन’ने, तरुण अभियांत्रिकी प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी परिसंस्था मुळापासून बळकट करण्यासाठी, मुंबई येथील सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या ‘के.जे.सोमैया स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’ची ‘फॉर्म्युला स्टुडंट’ टीम, ‘ओरियन रेसिंग इंडिया’शी भागीदारी केली आहे. भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे होणारे संक्रमण हे सुरुवातीच्या टप्प्यातच; प्रत्यक्ष कृतीतून मिळणारे शिक्षण, प्रयोगशीलता आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या अभियांत्रिकी क्षमतांचा विकास यातूनच घडवले जाणे अत्यावश्यक आहे, या लॉरिट्झ नुडसेनच्या विश्वासातूनच ही भागीदारी करण्यात आली आहे.

जेव्हा परिसंस्थेच्या पायाभूत स्तरावर नवनवीन उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल, तेव्हाच इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अर्थपूर्ण विस्तार होऊ शकेल. इलेक्ट्रिक आणि स्वायत्त वाहन प्लॅटफॉर्मची सक्रियपणे रचना तसेच निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांशी जोडले जाऊन, लॉरिट्झ नुडसेन पर्यावरणपूरक विचारांचा लवकरात लवकर स्वीकार करण्यास प्रोत्साहन देत आहे. भारताच्या विकसित होत असलेल्या ऊर्जा तसेच गतिशीलतेच्या क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी भविष्यासाठी सज्ज कौशल्ये विकसित करण्यास हातभार लावत आहे. हा सहभाग, सुरक्षित, कार्यक्षम आणि विस्तारक्षम विद्युतीकरण सक्षम करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधा आणि वीज वितरण प्रणालींसंदर्भातील आपल्या सेवा अधिक मजबूत करण्याच्या लॉरिट्झ नुडसेनच्या व्यापक उद्दिष्टांशीदेखील हे सुसंगत आहे.

ओरियन रेसिंग इंडियाकडे विद्यार्थी मोटरस्पोर्टमधील जवळपास दोन दशकांचा अनुभव असून, त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेतला आहे. शाश्वत गतिशीलतेच्या दिशेने होणाऱ्या जागतिक बदलांशी जोडलेले राहत या संघाने 2019 मध्ये अंतर्गत ज्वलन इंजिनावरून इलेक्ट्रिक प्रोटोटाइपकडे संक्रमण केले. त्यांची इलेक्ट्रिक रेसकार एक शिक्षण मंच म्हणून काम करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पॉवर सिस्टीम, ऊर्जा व्यवस्थापन, सुरक्षा आणि वाहनाची कार्यक्षमता यांसारख्या वास्तविक जगातील आव्हानांवर अभ्यासक्रमातील शिक्षण आजमावून पाहता येते.

या भागीदारीबद्दल लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनचे सीओओ, नरेश कुमार म्हणाले, “आज आपण जी परिसंस्था उभारणार आहोत, त्यातूनच भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या प्रवासाला आकार मिळेल. जेव्हा तरुण अभियंत्यांना नवनिर्मितीसाठी, वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी आणि त्यांनी शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रोत्साहित केले जाते, तेव्हाच अर्थपूर्ण बदलाची सुरुवात होते, असा आमचा विश्वास आहे. इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानावर सक्रियपणे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी जोडलेले राहून, आम्ही भविष्यासाठी सज्ज अशी प्रतिभा विकसित करण्यास मदत करत आहोत, जी भारताच्या मोबिलिटी आणि ऊर्जा क्षेत्राच्या भविष्यात निर्णायक भूमिका बजावेल.”

या संघाबद्दल सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या के. जे. सोमैया स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. उक्रांदे म्हणाले, “ओरियन रेसिंग इंडिया अनेक वर्षांपासून फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धांमध्ये के. जे. सोमैया स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रतिनिधित्व करते आहे, आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. हा  प्रवासाला खास बनवणारी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांची प्रत्येक तुकडी आपल्या आधीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण, अनुभव आणि उत्साहात सातत्य राखते. इलेक्ट्रिक रेसकारवर प्रत्यक्ष काम करण्याच्या माध्यमातून, आमचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन खऱ्या अभियांत्रिकी आव्हानांना सामोरे जातात. लॉरिट्झ नुडसेनसारख्या औद्योगिक भागीदारांकडून मिळणारा पाठिंबा या शिक्षण प्रणालीला अधिक मजबूत करतो आणि भारताच्या गतिशीलतेच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या क्षेत्रांमध्ये नवनवीन शोध लावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करतो.”

या भागीदारीच्या माध्यमातून, लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण आणि क्षमता-बांधणीला चालना देण्यासाठी, अगदी तळागाळातील तरुण अभियंत्यांशी जोडले जात आहे. भारताच्या सातत्याने विकसित होत असलेल्या मोबिलिटी क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये आणि विचारसरणी विकसित करण्यात योगदान देण्याच्या कंपनीच्या निरंतर प्रयत्नांचे हे प्रतिबिंब आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now