मुंबई, 30 मार्च 2026: फिटनेस उपकरणांच्या उत्पादन आणि व्यापारामध्ये तीन दशकांहून अधिक अनुभव असलेली एक भारतीय उत्पादक कंपनी जेराई फिटनेस लिमिटेड (यापुढे “जेराई फिटनेस” म्हणून उल्लेख) ने भारत तसेच शेजारील देश श्रीलंका, बांग्लादेश आणि नेपाळ येथे रीबॉक-ब्रँडेड जिम उपकरणांचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी रीबॉकसोबत एक अभूतपूर्व दीर्घकालीन भागीदारी जाहीर केली आहे. जेराई फिटनेस 1 एप्रिल 2026 पासून रीबॉक-ब्रँडेड जिम साधने, उपकरणे उपलब्ध करून देईल.
देशातील फिटनेस परिसंस्थेची पुर्नव्याख्या करण्यासाठी या सहयोग भागीदारीतून जेराई फिटनेसची पूर्णपणे स्वयंचलित तंत्रज्ञानयुक्त उत्पादन सुविधा आणि रीबॉकची जागतिक पातळीवरची परंपरा एकत्र येत आहे.
जेराई फिटनेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश राय म्हणाले, “आमच्या प्रगत उत्पादन क्षमतांचा आणि उत्कृष्टतेप्रती बांधिलकीचा उपयोग करून आम्ही परदेशी आणि देशांतर्गत कंपन्यांसोबत दीर्घकालीन भागीदारी उभारण्याचा उद्देश ठेवतो. त्यायोगे त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार उच्च-गुणवत्तेची उत्पादने तयार करून परस्पर वाढ आणि नवकल्पनांना चालना मिळू शकेल.”
“ही भागीदारी जागतिक फिटनेस उपकरण श्रेणीमध्ये रीबॉकचे स्थान वाढविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे रीबॉक, ऑथेंटिक ब्रँडचे ईव्हीपी मालक स्टीव्ह रोबेअर म्हणाले. “भारत ही गतिमान आणि झपाट्याने वाढणारी फिटनेस बाजारपेठ आहे आणि जेराई फिटनेसकडे मोठ्या प्रमाणावर उच्च-गुणवत्तेचे, कार्यक्षमतेवर आधारित साधने पुरविण्यासाठी आवश्यक उत्पादन कौशल्य आणि स्थानिक पातळीवरील माहिती आहे. एकत्रितपणे, आम्ही या प्रदेशातील खेळाडू, जिम्स आणि फिटनेस समुदायांना पाठबळ देण्यासाठी एक मजबूत पाया उभारत आहोत.”
या सहकार्याद्वारे दोन सिरीज अंतर्गत उत्पादनांची समग्र व्यापक व्यावसायिक श्रेणी सादर केली जात आहे. यामध्ये कार्डिओ, फ्री वेट्स आणि उच्च-स्तरीय घरगुती वापरासाठीच्या उपकरणांचा समावेश आहे. जेराई फिटनेस आपल्या उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ISO 9001:2015 (गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली), ISO 14001:2015 (पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली), ISO 45001:2018 (व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली) यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मानके आणि प्रमाणपत्रांचे पालन करते, तसेच ग्लोबल टेस्टिंग सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड द्वारे अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग अँड मटेरियल्स (ASTM) ने प्रमाणित आहे.
याशिवाय, जेराई फिटनेसला EN ISO 20957-1:2013, EN 957-2:2003 आणि EN 957-4:2006 या स्थिर प्रशिक्षण उपकरणांसाठीच्या युरोपियन सुरक्षा मानकांचे पालन केल्याबद्दल इंटरनॅशनल प्रोडक्टिविटी अँड क्वालिटी कौन्सिल (IPQC) कडूनही प्रमाणपत्र मिळाले आहे.
रीबॉक-ब्रँडेड जिम उपकरणांमध्ये प्रगत उत्पादन क्षमता आणि नाविन्यपूर्णता समाविष्ट असून त्यांना जेराई फिटनेसच्या पूर्णपणे स्वयंचलित उत्पादन प्रणालींचा आधार आहे. त्यायोगे अचूकता, गुणवत्ता आणि तंत्रज्ञान सुनिश्चित होते. यामुळे वाढती मागणी पूर्ण करणे, वाजवी किंमत राखणे आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत उत्पादने तयार करणे शक्य होते. जेराई फिटनेसची उत्पादन सुविधा पूर्णपणे स्वयंचलित उत्पादन प्रक्रिया सादर करते. कच्चा माल, घटक आणि तयार उत्पादने साठवण्यासाठी स्वतंत्र साठवणूक पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. त्यामुळे प्रभावी साठा व्यवस्थापन आणि सुलभ उत्पादन प्रवाह सुनिश्चित होतो. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत, या उत्पादन सुविधा केंद्राची वार्षिक जोडणी क्षमता 21,000 फिटनेस उपकरण युनिट्स इतकी होती.
ही उपकरण साधने जेराई फिटनेसच्या शोरूम्स आणि जेराई फिटनेसच्या अधिकृत वेबसाइट्स jeraihomegym.com आणि jeraifitness.com द्वारे संपूर्ण भारतात उपलब्ध केली जातील.





