यादें मध्ये सोनी सब दाखवतो एका डॉक्टरच्या जीवनाला मिळालेला हृदयस्पर्शी दुसरा संधी, आणि स्वतःची ओळख व ध्येय पुन्हा शोधण्याचा प्रवास

By: Editor_Manas

On: Wednesday, March 25, 2026 5:01 PM

Google News
Follow Us

सोनी सब, भारतातील आघाडीचा हिंदी जनरल एंटरटेनमेंट चॅनेल, अभिमानाने सादर करतो हुई गुम्म यादें – एक डॉक्टर, दोन जिंदगीयाँ. हा नवा शो सोमवार, 6 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जगभरात लोकप्रिय ठरलेल्या इटालियन ड्रामा डीओसी(डॉक) – नेल्ले तुए मानी वर आधारित, ही मालिका भारतीय प्रेक्षकांसाठी आणते एक हृदयस्पर्शी कथा – संघर्ष, नव्याने स्वतःला शोधण्याची प्रक्रिया आणि दुसऱ्या संधींच्या बदलत्या शक्तीची. या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतील लोकप्रिय कलाकार इकबाल खान, गुलकी जोशी आणि सृष्टी सिंह. यादें ही कथा एका डॉक्टरच्या आयुष्याभोवती फिरते, जो आपल्या भूतकाळाशी पुन्हा सामोरा जातो आणि स्वतःची ओळख व उद्दिष्ट नव्याने शोधण्याचा प्रयत्न करतो.

कथेच्या केंद्रस्थानी आहे डॉ. देव मेहता, ज्याची भूमिका साकारत आहे इकबाल खान. एक हुशार आणि प्रतिभावान डॉक्टर, ज्याचे आयुष्य एका अपघातामुळे पूर्णपणे बदलते – कारण त्या अपघातात त्याच्या आठ वर्षांच्या आठवणी पुसल्या जातात. भूतकाळ आणि त्याने उभारलेले आयुष्य हरवल्यानंतर, देवला नव्या आणि अनोळखी जगात पाऊल टाकावे लागते. त्याला स्वतःच्याच अशा रूपाशी सामना करावा लागतो, ज्याला तो आता ओळखत नाही. या प्रवासात उलगडते एक हृदयस्पर्शी कथा – स्वतःला नव्याने शोधण्याची. यात तो पुन्हा आपले करिअर उभे करतो, तुटलेल्या नात्यांना जोडतो आणि वैद्यकीय क्षेत्राकडे तसेच आयुष्याकडे अधिक संवेदनशील, दयाळू दृष्टिकोनातून पाहायला शिकतो.

गुलकी जोशी साकारते सृष्टीची भूमिका – देवची माजी पत्नी. एक ताकदवान आणि संवेदनशील डॉक्टर, जिने आपल्या मुलांच्या संगोपनासाठी वैद्यकीय करिअर बाजूला ठेवले आणि आता हॉस्पिटलचे प्रशासन सांभाळते. देवच्या आठवणी हरवल्यानंतर त्यांच्या नात्यातील तडे पुन्हा उघड होतात, कारण तिला देवचे असे रूप दिसते जे तिला कायमचे हरवलेले वाटले होते. कथेला आणखी भावनिक गती देते सृष्टी सिंह, जी साकारते वाणीची भूमिका – एक महत्वाकांक्षी रेसिडेंट डॉक्टर, जी कधीकाळी देवला आदर्श मानत होती. या नव्या अध्यायात वाणी देवची सर्वात जवळची साथीदार ठरते. तिचे आणि देवचे नवे नाते दोघांच्या आयुष्याला नव्याने आकार देते.

सोबो फिल्म्स निर्मित यादें ही मालिका आहे डीओसी(डॉक)ची अधिकृत भारतीय रूपांतरित आवृत्ती. जगभरात लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेचे यशस्वी रूपांतर पाचपेक्षा अधिक देशांमध्ये झाले आहे. भावनिक गाभा कायम ठेवत, भारतीय प्रेक्षकांच्या मनाशी जुळेल अशा पद्धतीने या मालिकेचे रूपांतर विचारपूर्वक केले गेले आहे. यात कुटुंबातील नातेसंबंध आणि त्यातील गुंतागुंत यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया:

अजय भालवणकर, चीफ कंटेंट ऑफिसर, सोनी सब

“सोनी सब मध्ये आम्ही मानतो की टेलिव्हिजनमध्ये प्रेरणा देण्याची, जखमा भरून काढण्याची आणि कुटुंबांना जवळ आणण्याची ताकद आहे. यादें ही फक्त एक मालिका नाही, तर ती अशी कथा आहे जी आपल्याला स्वतःकडे नव्याने पाहायला भाग पाडते. जगभरात ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे आणि आता भारतीय प्रेक्षकांसाठी ती भावनिक दृष्टिकोनातून साकारली आहे. आम्हाला खात्री आहे की डॉ. देव मेहताचा प्रवास मनाला स्पर्श करेल आणि अर्थपूर्ण कथाकथनासाठी सोनी सब ची बांधिलकी पुन्हा अधोरेखित करेल.”

स्मृती शिंदे, निर्माता व संस्थापक, सोबो फिल्म्स

“सोबो फिल्म्स कडून आमच्यासाठी ‘यादें’ ही केवळ एक अ‍ॅडॅप्टेशन नाही — तर भारतीय प्रेक्षकांसाठी खास करून केलेली मनापासूनची पुनर्कथन आहे. डॉ. देव मेहता यांची कहाणी ही जिद्दीची, स्वतःला पुन्हा शोधण्याची आणि आयुष्याला दुसरी संधी देण्याचं धैर्य दाखवणारी आहे. या भावना सर्वत्र मानवी आहेत, पण त्याच वेळी खूप वैयक्तिकही आहेत. सोनी सब सोबतच्या भागीदारीमुळे आम्हाला ही दृष्टी मोठ्या प्रमाणावर आणि संवेदनशीलतेने साकारता आली आहे. त्यामुळे शोमध्ये डीओसी(डॉक) चा वारसा जपला गेला आहे, पण त्याच वेळी तो भारतीय कुटुंबांच्या भावनिक धाग्यांनाही प्रतिबिंबित करतो.”

इक्बाल खान डॉ. देव मेहता यांच्या भूमिकेत:

“कलाकार म्हणून आम्ही नेहमी अशा भूमिका शोधतो ज्या आम्हाला आव्हान देतात. पण डॉ. देव मेहता ही भूमिका केवळ आव्हान नाही — ती मानवी आत्म्याचं प्रतिबिंब आहे. आठ वर्षांची स्मृती हरवून पुन्हा आयुष्य उभं करणं ही फक्त वैद्यकीय कहाणी नाही, तर ती ओळख, प्रेम आणि दुसऱ्या संधींचा खोल भावनिक प्रवास आहे. देवची भूमिका साकारताना मला एकाच वेळी असुरक्षितता आणि जिद्द अनुभवता आली. मला खात्री आहे की प्रेक्षकांना त्यांच्या संघर्षात आणि विजयात स्वतःचे काही अंश दिसतील. ‘यादें’ ही आठवण करून देते की आयुष्य आपल्याकडून सगळं काही हिरावून घेतं, तरीही ते आपल्याला पुन्हा सुरुवात करण्याचं धैर्यही देतं.”

6 एप्रिलपासून यादें या मालिकेचा प्रीमियर होणार असून ती सोनी सब वर सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता प्रसारित होईल.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026