आयडी फ्रेश फूड ची ऑर्गेनिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा

By: Editor_Manas

On: Saturday, March 21, 2026 1:01 PM

Google News
Follow Us

पुणे, २१ मार्च २०२६ : भारतातील सर्वाधिक पसंतीचा फ्रेश फूड ब्रँड आयडी फ्रेश फूड (iD Fresh Food) ने ऑर्गेनिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा करत आयडी ऑर्गेनिक बॅटर लॉन्च केले आहे. हे लॉन्च आयडी च्या त्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये चव, प्रामाणिकता आणि पारदर्शकतेशी कोणतीही तडजोड न करता क्लीन-लेबल, ताजे आणि विश्वासार्ह दैनंदिन अन्नपदार्थ तयार केले जातात.

आपल्या ऑर्गेनिक बॅटर  रेंजसाठी कंपनी एक स्थापित ऑर्गेनिक सोर्सिंग मॉडेलद्वारे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील २,५०० हून अधिक शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करत आहे. या प्रक्रियेत एनजीओ सक्रियपणे शेतकरी सहभाग आणि स्थानिक पातळीवरील सहाय्य प्रदान करत आहेत. ही सोर्सिंग पद्धत जबाबदार शेतकरी भागीदारी आणि शाश्वत शेती पद्धतींप्रती iD ची दीर्घकालीन बांधिलकी दर्शवते.

लॉन्चबाबत प्रतिक्रिया देताना, आयडी फ्रेश फूड इंडियाचे सीईओ, रजत दिवाकर म्हणाले, “आयडी ऑर्गेनिक च्या पुढील टप्प्याची सुरुवात करताना आम्ही बाजारातील अंतर्दृष्टी लक्षात घेऊन या उत्पादनाची नव्याने मांडणी केली आहे आणि उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आयडी मध्ये दैनंदिन अन्न नेहमीच विश्वास आणि पारदर्शकतेवर आधारित राहिले आहे, आणि ऑर्गेनिक क्षेत्रात प्रवेश करणे ही त्या विश्वासाची नैसर्गिक पुढची पायरी आहे. आयडी ऑर्गेनिक बॅटर द्वारे आम्ही ग्राहकांना प्रमाणित ऑर्गेनिक सोर्सिंगची हमी देत आहोत, तसेच त्यांनी आमच्याकडून अपेक्षित असलेली चव, ताजेपणा आणि सातत्य कायम ठेवत आहोत.”

हे उत्पादन पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि चेन्नई येथे लॉन्च केले जाईल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म तसेच निवडक मॉडर्न ट्रेड आउटलेट्समध्ये उपलब्ध असेल. दुसऱ्या टप्प्यात ही रेंज हळूहळू इतर शहरांमध्ये आणि वितरण माध्यमांमध्ये विस्तारला जाईल.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026