ह्युंदाई ‘आर्ट फॉर होप’ उपक्रमाने ५ सीझन्‍समध्‍ये २०० आर्टिस्‍ट्सना २.३ कोटी रूपयांचे अनुदान दिले

By: Editor_Manas

On: Friday, March 20, 2026 3:31 PM

Google News
Follow Us

नवी दिल्‍ली । मार्च, २०२६: ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्‍या परोपकारी शाखेने नवी दिल्‍लीमधील त्रावणकोर पॅलेस येथे आपला प्रमुख उपक्रम ‘आर्ट फॉर होप’च्‍या सीझन ५ चे उद्घाटन केले. या उपक्रमामध्‍ये २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ५० अनुदानप्राप्‍त आर्टिस्‍ट्स आणि कला गटांचा सन्‍मान करण्यात आला, ज्यांना एकूण ६० लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला. या पाचव्या एडिशनसह ‘आर्ट फॉर होप’अंतर्गत देण्यात आलेल्या एकूण अनुदानाने आता २.३ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, याचा लाभ देशाच्या कानाकोपऱ्यातील २०० आर्टिस्‍ट्सना मिळाला आहे. तसेच, एचएमआयएफने देशभरातील विविध कला-आधारित उपक्रमांच्या माध्यमातून २५,००० हून अधिक आर्टिस्‍ट्सना सक्षम केले आहे.

आर्ट फॉर होप – सीझन ५ च्‍या महत्त्वाबाबत मत व्‍यक्त करत भारतासाठी रिपब्लिक ऑफ कोरियाचे अॅम्‍बेसेडर महामहिम श्री. ली सेओंग-हो म्‍हणाले, ”आर्ट फॉर होप उपक्रमाला विशेषत: अर्थपूर्ण बनवणारी बाब म्‍हणजे हा उपक्रम वैयक्तिक आर्टिस्‍ट्सना साह्य करतो, जे महत्त्वपूर्ण सामाजिक व पर्यावरणीय विषयांप्रती कार्य करतात. या उपक्रमामधून सर्जनशीलता, समुदाय आणि सांस्‍कृतिक विकासाला पाठिंबा देण्‍याप्रती ह्युंदाई मोटर इंडियाची कटिबद्धता दिसून येते. रिपब्लिक ऑफ कोरियाचे दूतावास या प्रयत्‍नांना महत्त्व देतात, तसेच अधिक उत्‍साहासह या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.”

आर्ट फॉर होप – सीझन ५ च्‍या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मत व्‍यक्त करत एचएमआयएलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. तरुण गर्ग म्‍हणाले, ”ह्युंदाईचा जागतिक दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’मध्‍ये सामावलेला आर्ट फॉर होप उपक्रम एचएमआयएफच्‍या ‘समान मूल्‍य निर्माण करण्‍याच्‍या’ दृष्टिकोनाला पुढे घेऊन जातो. या उपक्रमासह आम्ही सामाजिक परिवर्तन घडवून आणणाऱ्यांमध्ये गुंतवणूक करतो, उदयोन्मुख आणि पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नसलेल्‍या आर्टिस्‍ट्सना पाठबळ देतो, भारताचा समृद्ध वारसा जपतो आणि समुदायांना प्रगत करणाऱ्या सर्जनशीलतेला सक्षम करतो. सीझन ५ हा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण टप्‍पा ठरला आहे, जेथे एकूण अनुदानाने २.३ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्‍याचा प्रत्‍यक्ष लाभ २०० आर्टिस्‍ट्सना मिळाला आहे आणि २५,००० हून अधिक कला अभ्यासकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. दरवर्षी उत्कृष्ट आर्टिस्‍ट्स आणि कला गटांना पाठिंबा देऊन आम्ही भारतासाठी आणि आपल्या सामायिक भविष्यासाठी संकल्‍पनांना प्रत्‍यक्ष प्रभावात आणत आहोत.”

ठळक वैशिष्‍ट्ये: आर्ट फॉर होप – सीझन ५  

  • एकूण ५० अनुदान विजेते: यामध्ये १० कला गट आणि ४० वैयक्तिक आर्टिस्‍ट्ससह ५ विकलांग आर्टिस्‍ट्सचा देखील समावेश आहे.
  • हरियाणा, तामिळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आसाम, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांसह भारतातील २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील जवळपास ८०० आर्टिस्‍ट्सकडून अर्ज प्राप्‍त झाले होते.
  • भारतातील वैविध्‍यपूर्ण सर्जनशील पैलूंचे प्रभावी सादरीकरण, ज्‍यामध्‍ये ग्रामीण भागातील कला समूह, आदिवासी कथाकार, शहरी नवप्रवर्तक व डिजिटल क्रिएटर्स यांचा समावेश आहे, जे संवाद, सर्वसमावेशकता आणि सामाजिक जागरूकता निर्माण करण्यास मदत करतात.

आर्ट फॉर होप – प्रदर्शन । २० ते २२ मार्च २०२६ । त्रावणकोर पॅलेस, नवी दिल्‍ली

आर्ट फॉर होप उपक्रमाचा भाग म्‍हणून एचएमआयएफ सर्वसमावेशक कला प्रदर्शनाचे आयोजन करत आहे, ज्‍यामध्‍ये सर्व सीझन ५ अनुदान विजेत्‍यांच्‍या कलाकृती पाहायला मिळतील. हे प्रदर्शन सर्वांसाठी, तसेच शारीरिक हालचालींच्या समस्या असलेल्या व्यक्ती, श्रवणदोष आणि दृष्टिदोष असलेल्या अभ्यागतांसाठी उपलब्‍ध असण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आले आहे. यासाठी स्पर्शक्षम कलाकृती, ऑडिओ-व्हिज्युअल सांकेतिक भाषा दौरे आणि ब्रेल लिपीतील माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आर्ट फॉर होपच्या माध्यमातून, अनुदान प्राप्‍तकर्त्‍यांना आर्थिक सहाय्यतेसह सामाजिक ओळख, व्यावसायिक प्रसिद्धी आणि भावनिक आधार देखील मिळतो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीच्या कलाप्रकारात शाश्वत कारकीर्द घडवण्यास मदत होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026