महिला दिनानिमित्त “गौरव तीच्या कर्तृत्वाचा” कार्यक्रम उत्साहात संपन्न

By: Editor_Manas

On: Saturday, March 21, 2026 12:57 PM

Google News
Follow Us

पुणे : महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. दुधभाते नेत्रालय व आदित्य फाउंडेशन यांच्या तर्फे “गौरव तीच्या कर्तृत्वाचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात सौ. राधिका जहागिरदार, डॉ. अपर्णा देशमुख आणि सौ. अनिता देवकर यांना “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

या प्रसंगी डॉ. दुधभाते नेत्रालयाचे सर्वेसर्वा डॉ. अनिल दुधभाते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस सहायक आयुक्त रुक्मिणीताई गलांडे होत्या. तसेच महानगरपालिका नगरसेविका ज्योतीताई गोसावी, धनश्रीताई कोल्हे, विखे वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. राम पडळकर, दत्ताभाऊ कोल्हे, आसावरी चव्हाण, साहित्यिक गिरीश वसेकर, डॉ. स्नेहल मानपुत्र, शितल हिरळकर, गौरी निमकर, कोमल भोसले व अनुराग क्षीरसागर यांच्यासह डॉ. दुधभाते नेत्रालयाचा संपूर्ण कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत समाजात प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 21, 2026

March 21, 2026

March 21, 2026

March 21, 2026

March 21, 2026

March 20, 2026