१ लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण; गोदरेज प्रॉपर्टीजकडून मुंबईतील कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट

By: Editor_Manas

On: Tuesday, March 3, 2026 5:09 PM

Google News
Follow Us

मुंबई, मार्च २०२६: विश्वास, कृतज्ञता आणि प्रगतीच्या एका सुवर्णक्षराचे साक्षीदार होत, गोदरेज प्रॉपर्टीजने १,००.००० घरांच्या विक्रीचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या यशाचे अनोखे सेलिब्रेशन म्हणून कंपनीने नवी मुंबईतील नेरुळ येथील रहिवासी असलेल्या नैना कुटुंबाला एक घर विनामूल्य भेट दिले आहे. ग्राहकांनी गेल्या अनेक वर्षांपासून गोदरेज समूहावर दाखवलेला अढळ विश्वास आणि त्यांच्यासोबत असलेल्या घट्ट नात्याचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे.

पनवेल येथील गोदरेज सिटीमध्ये साकारलेले हे घर गोदरेज प्रॉपर्टीजच्या मूळ विचारधारेचे प्रतीक आहे. प्रत्येक घर हे प्रगती, आकांक्षापूर्ती आणि आपलेपणाची अनोखी कहाणी असते अशी कंपनीची धारणा आहे. या खास प्रसंगाचे औचित्य साधून कंपनीने लाखों मे एक ही विशेष मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम गोदरेजवर विश्वास ठेवून घराची निवड करणा-या १ लाख कुटुंबांना समर्पित आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून कंपनीने एका ग्राहकाला हक्काचे घर भेट दिले आहे. अत्यंत पारदर्शक आणि चोख प्रक्रियेतून या लाभार्थ्याची निवड करण्यात आल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. ही कोणतीही स्पर्धा किंवा ल़ॉटरी नसून, कंपनीच्या या सशस्वी प्रवासात सोबत असलेल्या ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उचलले पाऊल आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले, ‘ हा क्षण म्हणजे एक लाख कुटुंबांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, श्रध्दा आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीचा मोठा सोहळा आहे. आम्ही सुपूर्द केलेली प्रत्येक घराची किल्ली ही आशेची एक नवी गोष्ट सांगते. आम्ही उभारलेली प्रत्येक वसाहत ही भारताच्या बदलत्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. एक लाख ग्राहकांचा हा टप्पा गाठल्यामुळे आम्हांस अभिमान आणि कृतज्ञता अनुभवता येत आहे. याचसोबत आता अगोदरपेक्षाही जास्त आत्मीयतेने आणि पूर्ण निष्ठेने काम करण्याची आमची जबाबदारी अधिक वाढली आहे, याची जाणीव होत आहे.’’

नवे घर मिळाल्याबद्दल प्रियांका आणि श्यामकुमार नैना यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘ जेव्हा आम्हांला ही बातमी समजली त्यावेळी विश्वासच बसला नाही. हा आनंद पचवायला थोडा वेळ लागला. गेल्या १० वर्षांच्या आमच्या बचतीनंतर या निर्णयामुळे आमच्यासाठी अशा संधींची दारे उघडली आहे. याबद्दल आम्ही कल्पनाही केली नव्हती. आमची मुले अनिरुद्ध आणि अनाया आता गोदरेज सिटीसारख्या उत्तम वातावरणात मोठी होतील, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. या ठिकाणी मुलांना खेळायला मोकळी जागा आहे, सहकार्य करणारे शेजारी आहेत. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांसाठी हवी असते अशी सुरक्षित आणि पोषक परिसंस्था आहे.’’

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले, ‘लाखों में एक हा उपक्रम आमच्यावर विश्वास ठेवणा-या प्रत्येक घरमालकाचा सन्मान करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. घर खरेदीच्या प्रत्येक निर्णयामागे प्रबळ इच्छाशक्ती, भावना आणि अपार कष्ट दडलेले असतात. गोदरेज प्रॉपर्टीला मानाचे स्थान मिळवण्यात योगदान देणा-या सर्व ग्राहकांचे मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. भविष्याचा वेध घेताना समृद्ध जीवनशैली, नाती बहरणा-या वास्तूंची निर्मिती करणे जेणेकरुन लोकांच्या दैनंदि आयुष्यात आनंद निर्माण होईल, हेच आमचे ध्येय आहे.’’ 

गोदरेज प्रॉपर्टीजने स्थापनाकाळापासूनच गुणवत्तेसह, विचारपूर्वक तयार केलेले डिझाइन आणि शाश्वतता या त्रिसूत्रीवर आधारित समुदायांची निर्मिती करण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. जबाबदार नागरीकरण आणि उज्ज्वल भविष्याप्रती असलेली कटिबद्धता सिद्ध कऱण्यासाठी, गोदरेज प्रॉपर्टीजचा प्रत्येक प्रकल्प हा ग्रीन-सर्टीफाइड विकास आहे. भविष्यातील प्रगतीचा टप्पा गाठताना, आजही कंपनी त्याच शाश्वत दृष्टीकोनातून वाटचाल करत आहे. यातून वास्तू उभारणीसह जीवन समृद्ध होते, मानवी नातेसंबंध बहरतात आणि दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या आनंदाला हक्काचे घर मिळते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026