“वयानुसार वाढणाऱ्या लघवीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका” – डॉ. सचिन भुजबळ

By: Editor_Manas

On: Monday, March 16, 2026 1:14 PM

Google News
Follow Us

वयानुसार वाढणाऱ्या लघवीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन प्रख्यात मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सचिन भुजबळ यांनी केले. वय वाढल्यावर अशा तक्रारी सामान्यपणे दिसतात; मात्र योग्य वेळी तपासणी आणि उपचार घेतल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. निरोगी जीवनशैली आणि नियमित आरोग्य तपासणीही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना (अस्कॉप) कोथरूड विभाग आणि एस हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडवणे येथील एस हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व्याख्यान व मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना एस हॉस्पिटलचे सिनियर युरॉलॉजिस्ट डॉ. भुजबळ यांनी ज्येष्ठ नागरिकांना मूत्रविकारांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पुणे शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रख्यात दंतचिकित्सक प्रा. डॉ. अनुपमा गोरडे-पाटणकर यांनी कवळी (कृत्रिम दात) यांची योग्य निवड, वापर आणि काळजी याबाबत माहिती दिली. कृत्रिम दात योग्य प्रकारे बसवले आणि त्यांची स्वच्छता व निगा राखली तर दैनंदिन जीवन अधिक आरामदायी होते आणि तोंडाचे आरोग्य टिकून राहते, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे संयोजन एस हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सागर पाटणकर यांनी केले. कार्यक्रमाला एस हॉस्पिटलचे न्युरो-युरोलॉजिस्ट डॉ. सौरभ उपलेंचवार उपस्थित होते. तसेच अस्कॉपचे अध्यक्ष श्री. दिलीप पवार, कार्याध्यक्ष श्री. श्रीराम बेडकीहाळ, गटप्रमुख श्री. गोविंद कोटीगिरे तसेच संपर्क प्रमुख श्री. उदय रेणुकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक श्रीपाद जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अस्कॉपच्या पदाधिकारी सौ. श्रद्धा चिटणीस यांनी केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026