बजाज लाइफ इन्शुरन्सकडून ‘बजाज लाइफ अपॉर्च्युनिटीज फंड’ लाँच; विकासाच्या संधी साधण्याचे उद्दिष्ट

By: Editor_Manas

On: Tuesday, March 3, 2026 5:05 PM

Google News
Follow Us

पुणे, मार्च २०२६: बजाज लाइफ इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपनीने आज आपली न्यू फंड ऑफर (एनएफओ) ‘बजाज लाइफ अपॉर्च्युनिटीज फंड’च्‍या (एसएफआयएन: ULIF011406/02/26BLOPNLC250116, जोखीम प्रोफाइल: अत्यंत उच्च, बेंचमार्क: निफ्टी लार्ज मिडकॅप २५०) लाँचची घोषणा केली. गुंतवणूकदारांना मोठ्या कंपन्यांच्या (लार्ज-कॅप) शेअर्समधील स्थिर परताव्याची क्षमता आणि मिडकॅप कंपन्यांमधील उच्च वाढीची क्षमता यांचा दुहेरी फायदा मिळवून देण्यासाठी हा फंड डिझाइन करण्‍यात आला आहे. बजाज लाइफच्या युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (युएलआयपी)अंतर्गत उपलब्ध असलेला हा फंड पॉलिसीधारकांना त्यांची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्याची संधी देतो. यात जीवन विमा संरक्षणासोबतच तज्ज्ञांद्वारे व्यवस्थापित इक्विटी गुंतवणुकीचा दुहेरी लाभ मिळतो.

‘बजाज लाइफ अपॉर्च्युनिटीज फंड’ एक गतिमान धोरण अवलंबतो, ज्यामुळे प्रस्थापित क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या आणि वेगाने प्रगती करणाऱ्या उदयोन्मुख कंपन्यांमध्ये लवचिकता राखता येते. हे ‘फोर-इंजिन इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी’द्वारे राबवले जाते. यामध्ये स्थिरतेसाठी प्रस्‍थापित चक्रवाढ कंपन्‍या, वाढीसाठी उदयोन्‍मुख विजेते, उत्पादन-संबंधित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेसारख्या सरकारी सुधारणा आणि धोरणात्मक उपक्रमांशी सुसंगत असलेल्या संधी, तसेच मूल्यांकनातील तफावतीचा फायदा घेण्यासाठी विशेष परिस्थिती या चार प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित केले जाते.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत बजाज लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्री. श्रीनिवास राव रावुरी म्हणाले, भारत आज आपल्या आर्थिक विकासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. संरचनात्मक सुधारणा, धोरणात्मक वेग आणि सक्षम कॉर्पोरेट क्षेत्र यांमुळे या विकासाला बळ मिळत आहे. ‘बजाज लाइफ अपॉर्च्युनिटीज फंड’ हा लार्ज-कॅप क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या आणि प्रगतीची मोठी क्षमता असलेल्या मिड-कॅप व्यवसायांमध्ये संतुलित गुंतवणूक करून या दीर्घकालीन विकासगाथेमध्ये सहभागी होण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आमचा भर अशा कंपन्या शोधण्यावर आहे ज्यांची कमाई स्थिर आहे, ज्यांचे प्रशासन दर्जेदार आहे आणि ज्या बाजारपेठेतील विविध चक्रांमध्ये मूल्यवृद्धी करण्याची क्षमता राखतात. शिस्तबद्ध आणि संशोधनावर आधारित दृष्टिकोनातून, जोखीम व्यवस्थापनाच्या तत्त्वांशी सुसंगत राहून आमच्या पॉलिसीधारकांना दीर्घकालीन भांडवली वाढ मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

निफ्टी लार्ज मिडकॅप २५० निर्देशांकावर आधारित हा फंड शिस्तबद्ध ‘बेस्ट आयडियाज’ दृष्टिकोनातून दीर्घकालीन भांडवली वाढ साध्य करण्याचा प्रयत्न करतो. ७०० पेक्षा जास्त शेअर्सच्या विश्वातून ४० ते ५० उच्च-विश्वासार्ह कंपन्यांची निवड करून हा पोर्टफोलिओ तयार केला जातो (बाजारस्थितीनुसार शेअर्सची संख्या बदलू शकते). लार्ज-कॅप आणि मिड-कॅप शेअर्समध्ये किमान ६० टक्‍के आणि ७०-७५ टक्‍क्‍यांचे लक्ष्यित प्रमाण राखून विविधीकरणाद्वारे जोखीम संतुलित करणे आणि दीर्घकालीन वाढीच्या संधी साधणे हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. केवळ मिड-कॅप योजनांच्या तुलनेत या धोरणामुळे गुंतवणूकीत कमी अस्थिरता राहते, तर पारंपारिक लार्ज-कॅप योजनांच्या तुलनेत अधिक वाढीची क्षमता मिळते.

सध्या हा फंड ऑटोमोटिव्‍ह, फार्मास्युटिकल्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे, ज्यांना संरचनात्मक अनुकूल घटकांचा पाठिंबा मिळत आहे. देशांतर्गत मागणीतील सुधारणा, जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता आणि अलीकडच्या बाजारपेठेतील घसरणीनंतर निर्माण झालेली गुंतवणूकीची संधी यामुळे या क्षेत्रांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

‘बजाज लाइफ अपॉर्च्युनिटीज फंड’ हा वाढ आणि संरक्षण अशा दोन्ही गोष्टी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी भविष्याचा वेध घेणारा उत्तम पर्याय आहे. गुंतवणूकीचे शिस्तबद्ध धोरण आणि बाजारपेठेनुसार स्थिर राहण्याची क्षमता यांचा मेळ घालत बजाज लाइफ इन्शुरन्स आपल्या ग्राहकांना भारताच्या दीर्घकालीन विकास प्रवासाशी सुसंगत असे महत्त्वपूर्ण उपाय आणि सर्वसमावेशक जीवन विमा संरक्षण उपलब्ध करून देत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026