वास्तुआरेखकांनी शहरी पुनर्विकासाचा पुनर्विचार करावा

By: Editor_Manas

On: Sunday, March 1, 2026 8:32 AM

Google News
Follow Us

पुणे: जुन्या-नव्या इमारती, काही वारसास्थळे, वाडे आणि अन्य प्रांतांतून स्वतंत्र वस्ती करून राहणारे समाजगट, अशी सरमिसळ हे आजच्या शहरांचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर शहराचा विकास आणि गृहनिर्माण, यांचा पुनर्विचार वास्तूआरेखकांनी करावा, असे प्रतिपादन नगरसेवक कुणाल टिळक यांनी केले.

इनाफ फोरम व सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज यांच्या संयुक्त विद्यमाने एव्हीपी ग्रुप च्या सहकार्याने आयोजित पाचव्या ‘ओपन आयडियाज नॅशनल स्पर्धा २०२५’च्या पारितोषिक वितरण समारंभात कुणाल टिळक बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ‘इनाफ’चे संस्थापक अध्यक्ष कीर्ती शहा, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजच्या विश्वस्त अनघा परांजपे-पुरोहित, हाऊसिंग ॲड अर्बन डेव्हलपमेंट विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सल्लागार जेफ्री पेन (ऑनलाईन), व्हीके ग्रुपचे विश्वास कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

ह्या नॅशनल स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून स्पर्धकांकानी सहभाग नोंदविला होता. अफोर्डेबल अर्बन हाऊसिंग,फर्निचर आणि इंटिरियर डिझाईन, रूरल हौसिंग आणि स्लम इम्प्रोव्हमेन्ट या मध्यवर्ती संकल्पनेवर हि स्पर्धा आयोजित केली होती. यातील विजेत्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. त्यांनी आपल्या प्रकल्पाविषयी सादरीकरण केले. त्याचप्रमाणे एव्हीपी ग्रुप सोलापूर येथील चीफ मार्केटिंग ऑफिसर विश्वनाथ फाळके यांनी सोलापूर येथील रे नगर प्रकल्पाविषयी केस स्टडी सादर केली.

कुणाल टिळक म्हणाले, “पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, जुने वाडे, मंडई, तुळशीबाग, ग्रामदैवते, शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, लाल महाल अशा वारसास्थळांसह जुन्या पेठेतील वाडे, बैठ्या घरांच्या जागी उभारलेल्या इमारती आहेत. या भागात पुनर्विकास होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे. परवडण्याजोग्या घरांची संकुले उभारताना तिथे छोट्या उद्यानांची, वृक्ष लागवड व्यवस्था करण्यास प्राधान्य असावे.”

कीर्ती शहा म्हणाले, शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शहरातील गृहनिर्माण अधिक आव्हानात्मक झाले आहे. आजही छोट्या घरात तीन पिढ्या एकत्र नांदण्याचे प्रमाण लक्षणीय दिसते. प्रत्येकाच्या अपेक्षा, गरजा निराळ्या असतात. मर्यादित जागेत या अपेक्षा पूर्ण करण्याचे नवे आव्हान नव्या पिढीच्या आर्किटेक्टसमोर आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्याची प्रचीती येत आहे.

जेफ्री पेन यांनीही शहरी क्षेत्र राहण्यायोग्य आहे का, तसेच हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर शहरे निवासयोग्य असतील का, असे प्रश्न उपस्थित केले. घरांसाठी जागेची उपलब्धता ही समस्या बनली आहे आणि तरीही घरांची मागणी वाढती आहे, ही वस्तुस्थिती आहे. नव्या आर्किटेक्ट्ससमोर असलेले हे आव्हान मोठे आहे, असे ते म्हणाले.

अनघा परांजपे पुरोहित यांनी परिचय करून देत स्पर्धेविषयीची माहिती दिली. डाॅ. पूर्वा केसकर, आर्किटेक्ट ऋषिकेश कुलकर्णी, द्वैंपायन चक्रवर्ती, अमोल उंबरजे यावेळी उपस्थित होते. केतकी करमरकर यांनी सूत्रसंचालन केले तर समन्वय भुमा रमन, व्यसना सनी, प्रियांका बुरंगे, शालीन पालकर आणि सुमित कापसे यांनी केले. विजेत्यांना कॅश प्राइजेस, सन्मानचिन्ह आणि सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. भारतातील व विदेशातील तज्ञ मंडळी यांनी जुरी मेंबर म्हणून भूमिका पार पाडली.

हौसिंग स्टुडिओ च्या अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेमध्ये ब्रिक कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आणि व्हीआयटी वेल्लोर हे विजेते ठरले आहेत.

ओपन आयडियाज नॅशनल स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे : रिया गोडांबे (म्हाडा प्रधानमंत्री एफओर्डब्ल हौसिंग प्रोजेक्ट), रूपक कालीनपूर (गॅविनपूरम हौसिंग प्रोजेक्ट ) ऍन मॅरी चाकोचन (लाईफ मिशन हौसिंग प्रोजेक्ट), जीनु कुरेन (दादासाहेब फाळके टाउनशिप), शताक्षी सावंत (दाऊब कन्स्ट्रक्शन ), परम मित्रा (सेटलमेंट पॅटर्न ऑफ प्राणपूर), निहारिक तारे (नायटिंग द नॅरेटिव्हस ), श्रद्धा खंडेलवाल (डीआयवाय शेल्टर)

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026