Appleचा ‘iPhone 17e’ भारतात लॉन्च; 48MP कॅमेरा, A19 चिपसह M4 iPad Airही सादर

By: Editor_Manas

On: Tuesday, March 3, 2026 4:58 PM

Google News
Follow Us

Appleने मार्च रोजी भारतासह जागतिक बाजारपेठेत आपल्या अपडेटेड 17 सिरीजमधील सर्वात परवडणारा स्मार्टफोन iPhone 17e लॉन्च केला. या नव्या मॉडेलमध्ये 48MP फ्युजन कॅमेरा, नवीन A19 चिपसेट, मॅगसेफ सपोर्ट आणि बेस व्हेरिएंटमध्ये दुप्पट म्हणजे 256GB स्टोरेज देण्यात आले आहे.

यासोबतच कंपनीने M4 प्रोसेसरसह अपडेटेड iPad Air देखील सादर केला असून तो मागील पिढीपेक्षा 30 टक्के अधिक वेगवान असल्याचा दावा करण्यात आला आहे.

किंमत आणि उपलब्धता

iPhone 17e आणि iPad Air यांची सुरुवातीची किंमत 64,900 रुपये आहे. iPhone 16e गेल्या वर्षी 59,900 रुपयांना लॉन्च झाला होता. मात्र, 17e च्या बेस मॉडेलमध्ये 256GB स्टोरेज दिल्याने किंमत वाढल्याचे मानले जाते.
दोन्ही डिव्हाइसची प्री-बुकिंग 4 मार्च रोजी सायंकाळी 7:45 पासून सुरू होणार असून विक्री 11 मार्चपासून होईल.

डिझाइन आणि फीचर्स

iPhone 17e मध्ये समोरच्या बाजूस Ceramic Shield 2 प्रोटेक्शन देण्यात आले आहे, जे स्क्रॅचपासून तीनपट अधिक सुरक्षितता देते. मागील बाजूस मॅट फिनिश असून हातातून घसरण्याची शक्यता कमी होते. फोनमध्ये ॲक्शन बटन, USB Type-C पोर्ट आणि नॉच डिझाइन कायम ठेवण्यात आले आहे. हा फोन सॉफ्ट पिंक, व्हाईट आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: 6.1 इंच सुपर रेटिना XDR OLED, 1200 निट्स पीक ब्राइटनेस
  • परफॉर्मन्स: 3nm प्रोसेसवर आधारित A19 चिपसेट; गेमिंगसाठी हार्डवेअर-एक्सेलरेटेड रे ट्रेसिंग सपोर्ट
  • कॅमेरा: 48MP फ्युजन कॅमेरा, इन-सेन्सर क्रॉपिंगद्वारे 2x ऑप्टिकल-क्वालिटी झूम; सेल्फीसाठी फेस आयडीसह फ्रंट कॅमेरा
  • बॅटरी व चार्जिंग: 30 मिनिटांत 50% चार्जिंग, 15W मॅगसेफ आणि Qi2 वायरलेस सपोर्ट
  • सॉफ्टवेअर: नवीन iOS 26, ज्यामध्ये कॉल स्क्रीनिंग व लाईव्ह ट्रान्सलेशनसह ‘ॲपल इंटेलिजन्स’ फीचर्स
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026