“भारताचे रंग, एकलच्या संगतीने” कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे दैदीप्यमान दर्शन; संगीत, नृत्य आणि नाट्याचा संगम; “रामायण” सादरीकरणाने मंत्रमुग्ध प्रेक्षक

By: Editor_Manas

On: Tuesday, March 24, 2026 3:18 PM

Google News
Follow Us

पुणे : “भारताचे रंग, एकलच्या संगतीने” हा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आदिवासी कलाकारांनी रामायण या महान महाकाव्यावर आधारित सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. फ्रेंड्स ऑफ ट्रायबल्स सोसायटी’च्या पुणे शाखेच्या वतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, घोडेगाव तसेच अकोले, अहिल्यानगर, मुरबाड आणि ठाणे येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गणेश वंदनेने झाली, ज्यामुळे वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवली.

एकल अभियानांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींच्या चमूने संगीत, नृत्य आणि नाट्यमय कथनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवले. राम, सीता आणि हनुमान यांसारख्या पात्रांचे सजीव सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.

पारंपरिक वेशभूषा, लयबद्ध नृत्य, प्रभावी संगीत आणि संवाद यांच्या संगमातून कलाकारांनी भारतीय परंपरा आणि संस्कारांचे वैभव उलगडले. या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांना भारतीय संस्कृतीची समृद्धता आणि विविधतेचा अनुभव घेता आला.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. त्यांनी कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या आत्मविश्वासात भर पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026