ऑलिव्ह बाय एम्बसीचे पुण्यात पदार्पण : बाणेर आणि वाकड येथे दुहेरी मालमत्तांसह मेट्रो विस्ताराला गती

२०३० पर्यंत पुण्यात ४० हून अधिक हॉटेल्स आणि १२०० हून अधिक कीजसह ऑलिव्हची पुढील मेट्रो पॉवरहाऊस योजना

एम्बसी ग्रुपचा तंत्रज्ञानाधारित हॉस्पिटॅलिटी ब्रँड ऑलिव्ह बाय एम्बसीने ऑलिव्ह हॉटेल बाणेर (४८ कीज) आणि ऑलिव्ह हॉटेल वाकड (३० कीज) या दोन महत्त्वाच्या मालमत्तांचे सादरीकरण करत आज पुण्यात अधिकृत प्रवेशाची घोषणा केली. पुण्यातील प्रमुख व्यवसाय-जीवनशैली विषयक मायक्रो-मार्केट्समध्ये महत्वाच्या ठिकाणी स्थित असलेली ही हॉटेल्स शहरातील वेगाने वाढणाऱ्या आयटी कॉरिडॉर्स, कॉर्पोरेट हब्स आणि विस्तारत असलेल्या निवासी क्षेत्रांना लक्षात घेऊन उभारण्यात आली आहेत.

या दोन्ही मालमत्तांचे उद्घाटन हा भारतातील प्रमुख महानगरांमध्ये ऑलिव्हच्या आक्रमक विस्तार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हिंजवडी हे भारतातील सर्वात मोठे आयटी हब, झपाट्याने विकसित होणारी पायाभूत सुविधा आणि वाढती व्यावसायिक प्रवासाची मागणी यांमुळे पुणे हे तंत्रज्ञान-सक्षम, कार्यक्षम हॉस्पिटॅलिटीसाठी उच्च क्षमतेची बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे.

“पुणे हे नाविन्यपूर्णता आणि उद्योगाचे केंद्र असून येथील व्यावसायिकांच्या वेगाशी जुळणाऱ्या स्मार्ट निवास व्यवस्थेची मागणी सातत्याने वाढत आहे,” असे ऑलिव्ह बाय एम्बसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक काहरामान यिगित यांनी सांगितले. “ऑलिव्ह हॉटेल बाणेर आणि वाकड ही आमच्या खास एआय-आधारित मॉडेलवर चालणारी हॉटेल्स असून आयटी पार्क्स, कॉर्पोरेट कार्यालये आणि लाइफस्टाइल डेस्टिनेशन्सना अखंड, विनाअडथळा आणि सोपा, सुलभ प्रवेश देतात. या शुभारंभामुळे आमचे पुणे महानगरातले स्थान अधिक भक्कम होत असून पुण्याच्या पुढील वाढीच्या टप्प्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत.”

ऑलिव्ह हॉटेल बाणेर हे प्रस्थापित बाणेर परिसरात स्थित असून कॉर्पोरेट सुलभता आणि सक्षम सामाजिक पायाभूत सुविधांचा संगम येथे साधण्यात आला आहे. ऑलिव्ह हॉटेल वाकड हे हिंजवडी प्रवाशांसाठी आणि दीर्घकालीन वास्तव्यासाठी उच्च मागणी असलेल्या वाकड भागात अतिशय योग्य ठिकाणी उभारले असून, वेस्टगेट बिझनेस पार्क आणि मुंबई–पुणे एक्सप्रेसवे येथे त्वरित जाता येऊ शकते. हे हॉटेल विशेषकरून आयटी सल्लागार, प्रोजेक्ट टीम्स आणि दीर्घकालीन व्यावसायिक वास्तव्यासाठी परिपूर्ण आहे.

पश्चिम भारतातील ऑलिव्हच्या वाढीचे केंद्र म्हणून पुणे महत्त्वाची भूमिका बजावत असून, २०३० पर्यंत हिंजवडी, पिंपरी चिंचवड, हडपसर, कल्याणी नगर, एमजी रोड, विमान नगर आणि कोरेगाव पार्क यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या कॉरिडॉर्समध्ये ४० हून अधिक  हॉटेल्स आणि १२०० हून अधिक कीज उभारण्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय पातळीवर, ऑलिव्ह २०२६ मध्ये १०० हून अधिक नवीन ठिकाणी विस्तार करण्याचे लक्ष्य ठेवत असून बंगळुरू, म्हैसूर, चिकमंगळूर, विजयवाडा आणि आता पुणे या नेटवर्कवर आधारित ही वाढ साध्य केली जाणार आहे. अलीकडील काळात सादर करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये ओपन हॉटेल्स (जगातील पहिले रिमोट एआय ऑपरेटर) तसेच १५० स्पार्क हॉटेल्ससाठी हिल्टनसोबतची भागीदारी यांचा समावेश आहे.