औंध – बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

By: Editor_Manas

On: Tuesday, February 24, 2026 10:49 AM

Google News
Follow Us

पुणे : पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून आज औंध–बोपोडी प्रभागातील विविध रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणी दौऱ्यात उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका भक्ती गायकवाड, तसेच आरपीआयचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, ज्ञानेश्वर जाविर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीबाबत माहिती देताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले की, प्रभागातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी आयुक्तांकडे मागील अनेक दिवसांपासून वेळ मागण्यात येत होता. मात्र काल आयुक्तांनी स्वतःहून प्रभागाला भेट देण्याची तयारी दर्शवत, नागरिकांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता आयुक्तांनी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट दिली.

या दौऱ्यात तथागत भगवान गौतम बुद्ध विपश्यना विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम (चिखलवाडी) तसेच हरीश ब्रिज शेजारील मोकळे पटांगण या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या सर्व संबंधित खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त नवल किशोर राम यांनी विपश्यना विहार व हॉकी स्टेडियमच्या प्रलंबित कामांचा आढावा घेत, ही कामे कोणताही विलंब न लावता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जागेवरच दिले. तसेच हरीश ब्रिजलगत असलेल्या मोकळ्या पटांगणाच्या ठिकाणी नागरिकांसाठी सुसज्ज उद्यान (गार्डन) विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

या प्रत्यक्ष पाहणीमुळे औंध–बोपोडी प्रभागातील रखडलेले व महत्त्वाचे प्रकल्प आता वेगाने मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी त्यांचा सन्मान करून वेळ दिल्याबद्दल आभार मानले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026