एलअँडटी फायनान्सकडून स्‍मार्ट आर्थिक निर्णयांसाठी सायबर सुरक्षा उपक्रम ‘सचेत विथ सचेत’ चा शुभारंभ

By: Editor_Manas

On: Thursday, January 1, 2026 3:44 PM

Google News
Follow Us

Pune: देशातील अग्रगण्य बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी एलअँडटी फायनान्स लिमिटेडने (पूर्वीची एलअँडटी फायनान्‍स होल्डिंग्‍ज लिमिटेड)‘सचेत विथ सचेत’ या महत्त्वाकांक्षी सायबर सुरक्षा उपक्रमाची घोषणा केली आहे. हा उपक्रम वापरकर्त्‍यांना डिजिटल आर्थिक क्षेत्रात नेव्हिगेट करण्‍याकरिता साधने व माहितीसह सक्षम करण्‍यासाठी सुरू करण्‍यात आला आहे. एलटीएफचा आर्थिक जागरूकतेचा प्रसार करणारा मस्‍कॉट ‘सचेत कुमार’चा ॲनिमेटेड अवतार असलेल्‍या या उपक्रमामध्‍ये परस्‍परसंवादात्‍मक तंत्रज्ञानासह गेमिफाईड माहितीचे संयोजन आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना नववर्ष २०२६ साठी सुरक्षित डिजिटल सवयी अंगिकारण्‍यास मदत होईल.  

एलटीएफने Ltfsachet.in ही विशेष लिंक तयार केली आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्यांना ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार ओळखता येतील, त्‍यासंदर्भात पूर्वतयारी करता येईल आणि सुरक्षित राहता येईल. या पोर्टलचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘लिंक व्हेरिफिकेशन टूल’, याद्वारे वापरकर्ते कोणतीही संशयास्पद वाटणारे यूआरएल (लिंक) सुरक्षित आहे की नाही, हे त्वरित तपासू शकतात. हे टूल ‘गुगल सेफ ब्राउझिंग’ आणि ‘ChatGPT API’ चा वापर करते, धोक्याची पातळी सोप्या रंग-संकेत प्रणालीद्वारे दर्शवते, ज्यामध्ये कोणतीही जोखीम नसलेल्‍या स्‍कॅमसाठी हिरवा, मध्यम धोका असलेल्‍या स्‍कॅमसाठी नारिंगी आणि उच्‍च जोखीम असलेल्या स्कॅमसाठी लाल रंगाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, या प्लॅटफॉर्मवर यूपीआय सुरक्षा, डीपफेक, फिशिंग आणि आगाऊ शुल्क फसवणूक यांसारख्या गंभीर विषयांवर आधारित फसवणूकीबाबत जागरूकतेचा प्रसार करणाऱ्या गेमिफाईड प्रश्नमंजुषा उपलब्ध आहेत. या वास्तविक प्रसंगांवर आधारित आव्हानांमधून यशस्वीरीत्या मार्ग काढणाऱ्या वापरकर्त्यांना ‘सचेत शील्ड’ हा डिजिटल बॅज देऊन‘स्कॅम-स्मार्ट’ म्हणून गौरविण्यात येईल.

Ltfsachet.in या लिंकवर ‘स्कॅम-सेफ्टी एज्युकेशन’ नावाचा एक विशेष विभाग देखील देण्यात आला आहे. यामध्ये डिजिटल शिक्षण मॉड्यूल्सची लायब्ररी आणि आर्थिक सुरक्षिततेबाबत जागरूकतेचे जुने व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्‍यामुळे वापरकर्त्यांना दैनंदिन जीवनातील डिजिटल धोके ओळखण्यास आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत होईल.

एलटीएफच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर (सीएमओ) कविता जगतियानी या उपक्रमाबद्दल माहिती देताना म्हणाल्या की, “आज स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारे ऑनलाइन फसवणुकीचे लक्ष्य करण्यात आले आहे. फसवणूक करणारे आता इतके प्रगत झाले आहेत की तंत्रज्ञानाच्या मदतीने खरे आणि खोटे यातील फरक ओळखणे जवळजवळ अशक्य झाले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाबाबत कमी माहित असलेल्‍या व्‍यक्तिंची ऑनलाइन फसवणूक होण्‍याचा मोठा धोका असतो आणि त्यांच्या आयुष्यभराची कष्टाची पुंजी एका क्षणात गमावण्याची भीती असते.‘सचेत विथ सचेत’ हा प्रत्येक नागरिकाला सुशिक्षित आणि सक्षम करण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्‍न आहे. सक्रिय साधने आणि सोपे मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन‘स्कॅम-स्मार्ट’ होणे हा प्रत्येकासाठी नवीन आदर्श बनवणे हे आमचे ध्येय आहे.”

ऑनलाइन फसवणूकींबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करण्‍यासाठी कंपनीने प्रभावशाली व्यक्ती आणि सोशल मीडिया धोरणाचा अवलंब केला आहे, जे परस्परसंवादी आणि समुदाय-आधारित सहभागावर आधारित आहे. यामध्ये पॉडकास्ट शैलीतील विशेष सहयोगांचा समावेश आहे, जेथे इन्फ्लुएन्सर्स ॲनिमेटेड  मस्कॉट ‘सचेत कुमार’ला पाहुणे म्हणून आमंत्रित करतील, जे नवीन वर्ष २०२६ साठी सुरक्षित डिजिटल व्यवहारांचे संकल्प शेअर करतील. यासोबत ‘वॉक्स पॉप’धोरणांतर्गत रस्त्यांवरील लोकांशी थेट संवाद साधून सायबर फसवणुकीवर चर्चा केली जाईल आणि ‘स्कॅम-स्मार्ट’ असल्याचे सिद्ध करणाऱ्या लोकांना प्रत्यक्ष ‘सचेत शील्ड’ ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026