लोहगावच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध; भाजपच्या डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ

लोहगा : लोहगावचा विकास केवळ घोषणांपुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दिसावा, हा माझा ठाम संकल्प आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण हे माझ्या प्राधान्यक्रमातील मूलभूत विषय असतील. महिलांना रोजगाराच्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास, स्वच्छ व सुंदर परिसर आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक ०३ मधील उमेदवार डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी आज औपचारिक शुभारंभ प्रसंगी केले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक ०३ मधील उमेदवारांच्या प्रचाराचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी वाघेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराची सुरुवात केली. यावेळी हजारो लाडक्या बहिणी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

लोहगाव परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉ. श्रेयस प्रीतम खांदवे-पाटील यांना पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ०३ (अ) मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत श्री. अनिल दिलीप सातव (ब गट), सौ. ऐश्वर्या सुरेंद्र पठारे ( क गट) व श्री रामदास दत्तात्रय दाभाडे (ड गट) हेही निवडणूक रिंगणात आहेत.

डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील या उच्चशिक्षित असून डॉक्टर आहेत. त्यांना सामाजिक सेवेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यांच्या कुटुंबाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोहगावच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे आजसासरे स्व. दत्तात्रय (भाऊ) रामभाऊ खांदवे हे स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी जवळपास वीस वर्षे ग्रामपंचायत समितीचे उपसभापती म्हणून कार्य करत पाणीपुरवठा, वीज, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केले.

त्यांचे सासरे स्व. प्रतापराव दत्तात्रय खांदवे-पाटील यांनी देखील सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. लोहगावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्वच्छता अभियान, शाळांमध्ये संगणक कक्ष उभारणी, पाण्याच्या टाक्या, रस्ते विकास, महिलांसाठी स्वयंरोजगार योजना तसेच युवकांसाठी प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘कृषिभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरवले होते.

लोहगावमध्ये अनेक सामाजिक उपक्रमांव्दारे मदतकार्य !

डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील गेल्या अनेक वर्षांपासून लोहगाव परिसरात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी विविध आरोग्य शिबिरे, पाणीपुरवठा सुधारणा, स्टॉर् ड्रेनेज, महिला बचत गटांना आर्थिक मदत, तसेच गरजू नागरिकांसाठी रोजगारनिर्मितीचे उपक्रम राबवले आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ लोहगावकरांना देणार !

जनतेने दाखवलेला विश्वास आणि दिलेले आशीर्वाद मी कधीही विसरणार नाही. या विश्वासाला मान देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थपणे काम करेन. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ लोहगावमधील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. १५ जानेवारी रोजी ‘कमळ’ चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा.

– डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील, उमेदवार, प्रभाग क्रमांक ०३, भाजप.