पिंपरीकरांना प्रत्यक्ष अनुभव – लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीटचा नजराणा
पिंपरी (प्रतिनिधी) — डी. जे. अम्युजमेंट प्रस्तुत, महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी–चिंचवडमध्ये लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट या भव्य संकल्पनांवर आधारित एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी नाविन्यपूर्ण कल्पना सादर करणाऱ्या डी. जे. अम्युजमेंटने यंदा पिंपरीकरांसाठी खास अशी “नवी नगरी” उभी केली असून, येथे लंडन ब्रिजवरून चालण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे प्रदर्शन एच. ए. मैदान, नेहरूनगर, पिंपरी – ४११०१८ येथे शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ पासून दररोज सायं. ५ ते रात्री १० या वेळेत खुले राहणार आहे.
भव्य रचना व आकर्षणे
येथे उभारलेला लंडन ब्रिज तब्बल १८० फूट लांब, ४५ फूट उंच आणि १५ फूट रुंद आहे. विद्युत रोषणाई व भित्तीचित्रांच्या माध्यमातून युरोपियन सिटी साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्व वयोगटांसाठी मनोरंजनाची रेलचेल असणार आहे.
राइड्स व गेम्स:
जायंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, ब्रेक डान्स, मोठा पाळणा; मुलांसाठी पेडल बोट, जंपिंग, मिनी ट्रेन आदी.
खरेदी व खाद्यपदार्थ:
घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, किचनवेअर, मुलांची खेळणी, तयार कपडे, पुस्तकांचे स्टॉल (डिस्काउंटसह).
पाणीपुरी, चाट, उटी-चिल्ली बज्जी, सोलापुरी पदार्थ, पॉपकॉर्न, कॉटन कँडी, आईस्क्रीम, चिल्ली गोबी, मिरची भजी, कूलड्रिंक्स इत्यादींची चव घेता येणार आहे. आकर्षक सेल्फी पॉइंट्सही उपलब्ध आहेत.
उद्घाटन सोहळा
उद्घाटन : शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५, सायं. ६:३० वा.
स्थळ : एच. ए. मैदान, नेहरूनगर, पिंपरी
प्रमुख पाहुणे:
-
राहुल (दादा) भोसले
-
समीर (दादा) मासुळकर
आयोजनाची माहिती पत्रकार परिषदेत सुदेश कुमार (मॅनेजर), जयराज, रवी नायर आणि संतोष जाधव यांनी दिली. “पिंपरी–चिंचवडकरांनी या अनोख्या नगरीला आवर्जून भेट द्यावी,” असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
— डी. जे. अम्युजमेंट, पिंपरी–चिंचवड









