तुमचा मोबाईल चोरीला गेला आहे? मग घरबसल्या करा ब्लॉक; गैरवापर होणार नाही

तुमचा मोबाईल चोरीला गेला आहे? मग घरबसल्या करा ब्लॉक; गैरवापर होणार नाही

पंचकुला, 29 जुलै : मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला की साहजिकच तणाव वाढतो. फोनमधील डेटा, वैयक्तिक माहितीचा गैरवापर होईल की काय, अशी भीती वाटू लागते. मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही. भारत सरकारने मोबाईल चोरी/हरवण्याच्या तक्रारींसाठी CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल तात्काळ ब्लॉक करू शकता, त्यामुळे कोणीही तुमच्या फोनचा किंवा डेटाचा गैरवापर करू शकणार नाही.

हे पोर्टल सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त असून घरबसल्या तक्रार नोंदवण्यासोबतच तक्रारीची स्थिती (स्टेटस)ही तपासता येते.

अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण

Department of Telecommunicationsच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील सायबर सेल आणि CCTNS अधिकाऱ्यांसाठी राज्य गुन्हे शाखेच्या मुख्यालयात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या प्रशिक्षणात CEIR पोर्टलवर मोबाईल चोरी/हरवल्याची तक्रार कशी नोंदवायची आणि तपास यंत्रणा या पोर्टलचा प्रभावी वापर कसा करू शकते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्यात ‘CEIR डेस्क’

पोलिस प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, ज्यांना पोर्टलचा वापर करणे अवघड जाते, त्यांच्यासाठी लवकरच प्रत्येक जिल्ह्यात मोबाइल-संबंधित तक्रारींसाठी ‘CEIR डेस्क’ सुरू करण्यात येणार आहे. येथे नियुक्त कर्मचारी नागरिकांच्या तक्रारी पोर्टलवर नोंदवतील, फोन सापडल्यास मालकाला कळवतील आणि पुढील कारवाई करतील.

CEIR पोर्टलवर चोरी/हरवलेल्या मोबाईलची तक्रार कशी करावी?

  1. मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला असल्यास प्रथम जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा.

  2. तुमच्या दूरसंचार सेवा प्रदात्याकडून त्या नंबरसाठी डुप्लिकेट सिम कार्ड घ्या.

  3. ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी पुढील लिंकवर जा:
    https://ceir.gov.in/Request/CeirUserBlockRequestDirect.jsp

  4. मोबाईल नंबर किंवा IMEI क्रमांक भरून आवश्यक माहिती सबमिट करा.

  5. संपर्कासाठी मोबाईल नंबर व पत्ता नोंदवा.

  6. तक्रार नोंदवल्यानंतर हँडसेट सर्व मोबाइल नेटवर्कवरून ब्लॉक होईल, त्यामुळे भविष्यात त्याचा वापर होणार नाही.

घरबसल्या, काही सोप्या टप्प्यांत तुमचा हरवलेला किंवा चोरीचा मोबाईल सुरक्षितपणे ब्लॉक करा आणि गैरवापराचा धोका टाळा.

‘शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची’; जानेवारी महिन्यात शाळा १० दिवस बंद राहणार , कारण काय?