‘स्वामी समर्थ कृपा करावी, जनतेच्या सेवेस बळ द्यावे’

By: Editor_Manas

On: Wednesday, December 31, 2025 5:07 PM

Google News
Follow Us

पुणे : ‘स्वामी समर्था कृपा करावी, जनतेच्या सेवेस बळ द्यावे’, अशी श्रद्धापूर्वक व सेवाभावी साद सौ. अमृता गणेश भोकरे व गणेश सोमनाथ भोकरे या दाम्पत्याने अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत घातली. प्रभाग क्र. २५-अ (शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसर) येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सौ. अमृता पुणे महानगरपालिका निवडुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘विजयी फुल डोक्यावर टाकून जनसेवेसाठी एक संधी द्यावी’ असा आशीर्वाद भोकरे दाम्पत्याने स्वामींकडे मागितला. यावेळी सुमारे २५०० माताभगिनींना स्वामींचे दर्शन घडवून आणत श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी नात्याचे दर्शन घडवले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निरंजन बाळासाहेब दाभेकर हे या दर्शन यात्रेचे सहआयोजक होते.

गणेश सोमनाथ भोकरे हे स्वच्छ प्रतिमा, आक्रमक, तरुण व आश्वासक चेहरा म्हणून गेल्या १८ वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्यात सौ. अमृता याही समर्पण भावनेने कार्यरत आहेत. दोघेही पती-पत्नी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण, तरुणांसाठी रोजगार आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. भोकरे यांनी दोनवेळा महापालिका आणि एकदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यात अवघ्या काही मतांनी आलेल्या अपयशावर मात देत ‘जनतेने दिलेला प्रत्येक मताचा आधार हा माझ्यासाठी आश्वासक ठेवा आहे,’ या भावनेने त्यांनी आपली सामाजिक कामगिरी अधिक गतीने सुरू ठेवली.

विकासाचा ठोस अजेंडा, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्याची तळमळ हा गणेश भोकरे यांचा वारसा घेऊन अमृता निवडणूक लढवत आहेत. अक्कलकोट स्वामींच्या चरणी साकडे घालताना, ‘या भागाच्या विकासासाठी, प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची एक संधी द्यावी,’ असे भावनिक आवाहन त्यांनी मतदारांना केले.

या दर्शनयात्रेत सहभागी झालेल्या माताभगिनींनीही प्रवासाचे, दर्शनाचे नियोजन, मुलाप्रमाणे घेतलेली काळजी, नाष्ट्या-जेवणाची उत्तम सोय याबाबत समाधान व्यक्त करत, ‘आमच्यासाठी वेळ काढणारा, आमच्या श्रद्धेला मान देणारा नेता आम्हाला हवा आहे,’ अशी भावना व्यक्त केली. शनिवार, नारायण, सदाशिव, शुक्रवार या पेठांसह मंडई परिसरातील महिलांनी या दर्शनाचा लाभ घेतला. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर आदी उपस्थित होते.

नको फक्त विजयाची आस, नको सत्तेचा गर्व,

स्वामी कृपेने चालत राहू, जनतेची सेवा हाच धर्म

‘या ओळींप्रमाणे श्रद्धा, संघर्ष आणि सेवाभाव या त्रिसूत्रीवर माझा विश्वास असल्याने निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद लाभेल आणि यंदा विजय नक्की होईल. स्वामी दर्शनाचा हा पहिला टप्पा होता. पुढच्या २६ जानेवारीच्या टप्प्यात ५००० महिलांना स्वामींचे दर्शन घडविणार असून, महापालिका निवडणुकीतील विजय स्वामींच्या चरणी अर्पण करेन,” असा विश्वास सौ. अमृता गणेश सोमनाथ भोकरे यांनी व्यक्त केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026