पुणे, ३० डिसेंबर २०२५ : कॉमिक कॉन या वार्षिक पॉप-कल्चर उत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात येणार आहे. मारुती सुझुकी अरेना आणि क्रंचीरोल यांच्या सहकार्याने पुणे कॉमिक कॉन चे २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी यश लॉन्स, बिबवेवाडी रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. कॉमिक कॉन इंडियाची ही १३ वी आवृत्ती पॉप-कल्चर फॅनडमच्या विश्वातील विविध पैलूंना समर्पित असलेला एक उत्साही वीकेंड असणार आहे. चाहत्यांना दोन दिवस कॉमिक्स, अॅनिमे, गेमिंग, कॉसप्ले तसेच विशेष अनुभवांचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. यंदाच्या कॉमिक कॉन इंडिया मध्ये फॅन झोन, विशेष फ्रँचायझींचे प्रदर्शन, क्रिएटर्सशी संवाद, कॉस्प्ले शोकेस, लाइव्ह परफॉर्मन्स आणि गेमिंग एरिना, या चाहत्यांना आवडणाऱ्या गोष्टी अनुभवता येणार आहेत.तसेच पुणे कॉमिक कॉन एक्सक्लुझिव्ह इमर्सिव्ह झोन, संवादात्मक पॅनल सत्रे, शानदार कॉस्प्ले शोकेस, स्पर्धात्मक गेमिंग एरिना आणि लाईव्ह एंटरटेनमेंट यांचा देखील समावेश असणार आहे. पुण्यातील बिबवेवाडी रोडवरील यश लॉन्स येथे २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या पुणे कॉमिक कॉन २०२६ साठीची तिकिटे आता डिस्ट्रिक्ट ॲप बाय झोमॅटो वर उपलब्ध करण्यात आली आहेत.
कॉमिक कॉन इंडिया पुणे एडिशन चे २१–२२ मार्च २०२६ रोजी आयोजन
By: Editor_Manas
On: Tuesday, December 30, 2025 5:08 PM
aapka prahar, aapka prahar times, editor_manas, mumbai pune news, mumbai pune rain, news of pune, prahaar, prahar, prahar janshakti, prahar protest pune, prahar sanghatana, prahar sanghatana news, prahar times, prahar times mumbra, protest in pune, pune, pune city news, pune handicap protest, pune live news marathi, pune local news, pune news, pune news now, pune news today, pune political news, pune prahar protest, pune protest, pune traffic protest, stone pelting pune, unique protest pune, violence in pune, zilla parishad pune





