आयुर्वेदाचार्य डॉ. हरीश पाटणकर यांना ‘आंतरराष्ट्रीय आयुर्वेद रत्न पुरस्कार’

By: Editor_Manas

On: Tuesday, December 30, 2025 5:19 PM

Google News
Follow Us

पुणे: पुण्यातील ख्यातनाम आयुर्वेदाचार्य डॉ. हरीश पाटणकर यांना बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषदेत प्रतिष्ठेचा ‘आंतरराष्ट्रीय आयुर्वेद रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध कन्नड अभिनेते व रंगभूमी दिग्दर्शक प्रकाश बेलवाडी यांच्या हस्ते डॉ. पाटणकर यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. पाटणकर यांना आयुर्वेदीय चिकित्सक, संशोधन आणि अध्यापन क्षेत्रातील अनेक दशकांच्या योगदानाबद्दल तसेच शुद्ध व पारंपरिक आयुर्वेदाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.

केंद्रीय आयुष मंत्रालय व कर्नाटक आयुष विभागाच्या सहकार्याने प्रशांती आयुर्वेद सेंटरतर्फे आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रचार, पारंपरिक आयुर्वेदीय ज्ञान आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेमधील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत देश-विदेशातील आठ हजारांहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. आयुर्वेद तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, धोरणकर्ते तसेच आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांचा यात समावेश होता.

परिषदेदरम्यान वैज्ञानिक सत्रे, परिसंवाद, मुख्य भाषणे, संशोधन सादरीकरणे आयोजिली होती. त्यामध्ये तज्ज्ञांनी पुराव्यावर आधारित आयुर्वेद, समन्वित वैद्यक पद्धती, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि भारतीय पारंपरिक ज्ञान प्रणालीचे जागतिक महत्त्व या विषयांवर सखोल चर्चा केली. डॉ. पाटणकर यांनीही परिषदेत ‘आधुनिक वैद्यकीय व्यवहारात पारंपरिक आयुर्वेदीय तत्त्वांचा प्रभावी उपयोग’ यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. डॉ. पाटणकर यांनी हा सन्मान गुरु डॉ. समीर जमदाग्नी, डॉ. गोपाकुमार आणि सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज यांना अर्पण केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026