मोहुआ सेनगुप्ता वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कंट्री हेड म्हणून नियुक्त
विमा, निवृत्ती आणि गुंतवणूक उत्पादने प्रदान करणारी अग्रणी अमेरिकन कंपनी द स्टॅंडर्डने आज स्टॅनकॉर्प ग्लोबल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (द स्टॅंडर्ड इंडिया) या नवीन ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरची स्थापना भारतात झाल्याची घोषणा केली. द स्टॅंडर्ड इंडियामार्फत उच्च-मूल्य रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार असून, कंपनीच्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशनला गती, नावीन्याला चालना आणि सततच्या वाढीस बळकटी मिळणार आहे. कंपनीने मोहुआ सेनगुप्ता यांची वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारतातील कंट्री हेड म्हणून नियुक्ती केल्याचीही घोषणा केली.
मोहुआ सेनगुप्ता यांना बँकिंग, वित्तीय सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे 30 वर्षांचा अनुभव आहे. अलीकडेच त्या नोवार्टिस इंडिया जीसीसीच्या प्रमुख पदावर कार्यरत होत्या. यापूर्वी त्यांनी थ्रीआय इन्फोटेक, आयटीसी इन्फोटेक, आयगेट, एंफॅसीस, अॅक्सेंचर, विप्रो आणि रॉयल बँक ऑफ कॅनडा यांसारख्या संस्थांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
“भारतामध्ये आमच्या ऑपरेशन्सचे नेतृत्व करण्यासाठी मोहुआ यांचे द स्टॅंडर्डमध्ये स्वागत करताना मला आनंद होत आहे,” असे द स्टॅंडर्डचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष ग्रेग चॅन्डलर यांनी सांगितले. “त्यांची कौशल्ये आणि नेतृत्वगुण द स्टॅंडर्डच्या संस्कृतीशी उत्तमरीत्या जुळतात. अमेरिकेतील आमचा व्यवसाय विस्तारताना त्या कंपनीसाठी मोठी संपत्ती ठरतील,” असेही त्यांनी नमूद केले.
“द स्टॅंडर्डमध्ये जलद वाढीच्या या उत्साहवर्धक काळात सोबत जोडले जाणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. द स्टॅंडर्ड इंडिया येथे जागतिक दर्जाच्या विशेष तज्ज्ञांची उपलब्धता वाढवेल, जे आमच्या विद्यमान आणि भावी ग्राहकांसाठी अधिक कार्यक्षम उपाय प्रदान करतील आणि संस्थेच्या शाश्वत वाढीस मदत करतील,” असे मोहुआ सेनगुप्ता, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारतातील कंट्री हेड यांनी सांगितले.
बंगळुरू आणि पुणे येथील सेंटरचे व्यवस्थापन — ज्यामध्ये वित्तीय, अनुपालन आणि नियामक विषयांचा समावेश आहे — यांची जबाबदारी सेनगुप्ता सांभाळतील. तसेच द स्टॅंडर्ड इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे नेतृत्व आणि व्यवस्थापनही त्या करतील.
प्रारंभी द स्टॅंडर्ड इंडियामध्ये 175 ऑलस्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. 1 एप्रिल 2025 रोजी द स्टॅंडर्डने ऑलस्टेट एम्प्लॉयर व्हॉलंटरी बेनिफिट्स व्यवसाय अधिग्रहित केल्यानंतर हे कर्मचारी कंपनीत सामील झाले होते आणि आता ते द स्टॅंडर्ड इंडियाचे पूर्णवेळ कर्मचारी बनत आहेत.
द स्टॅंडर्ड इंडियाकडे भारतात मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची योजना आहे. अद्ययावत माहितीसाठी खालील साइटला भेट द्या:
www.standard.com/standard-in








