Crime News : लग्नाचं आमिष, MH20 कॅफेत तरुणीवर अत्याचार, प्रेग्नंट होताच तरुण म्हणाला, ‘तुझे माझ्यासोबत असलेले…’

Crime News : लग्नाचं आमिष, MH20 कॅफेत तरुणीवर अत्याचार, प्रेग्नंट होताच तरुण म्हणाला, ‘तुझे माझ्यासोबत असलेले…’

छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर कॅफेमध्ये अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अजब नगर भागातील एमएच २० या कॅफेमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले आहे. अत्याचाराची घटना ही २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ५ वाजताच्या सुमारास घडली होती. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे नाव भागवत ज्ञानोबा मुलगीर (रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे आहे.

या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तरूणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता आणि भागवत मुलगीर या दोघांची ओळख होती. भागवत मुलगीर याने तरुणीशी जवळीक साधली. तिला लग्नाचे अमिष दाखवून २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अजबनगर येथील पैठण गेट रोडवर एमएच २० कॉफी शॉप येथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या घटनेनंतर भागवत मुलगीर याला पीडित तरुणीने ती गर्भवती असल्याचे सांगितले. भागवत मुलगीर याने गर्भधारणेबाबत ऐकताच जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच गर्भ पाडण्यासाठी काही औषधी देऊन गर्भपात करण्यास भाग पाडले. गर्भपाताची औषधी खाऊ घालण्यासाठी ‘तुझे माझ्यासोबत असलेले फोटो व्हायरल करून टाकेन’ अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात पीडित तरुणीने भागवत मुलगीर याच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पीडितेचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. यानंतर पीडितेने भागवत मुलगीर याच्या बहिणीला आणि वडिलांना त्यांच्या संबंधाबाबत माहिती दिली असता, भागवत याची बहीण आणि वडिलांनीही तिला शिवीगाळ करून तुला जे करायचे ते कर, असे सांगून आम्ही कोण आहोत. ते तुला माहिती नाही. असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी तरूणीवर अत्याचार करणाऱ्या भागवत मुलगीर याच्या विरोधात अनूसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यासह महिलेवर अत्याचार प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पेालिस आयुक्त सागर देशमुख हे करत आहेत.