सक्रियपणे व्यवस्थापित पदार्पणीय एनएफओच्या माध्यमातून जवळपास २००० कोटी रूपये किंवा त्याहून अधिक निधी उभारणाऱ्या आधुनिक एएमसींच्या निवडक समूहामध्ये सामील झाले, ज्यामुळे एमएफ उद्योगामध्ये लाँच करण्यात आलेला सर्वात शक्तिशाली सक्रिय फंड ठरला
मुंबई, ऑक्टोबर २४, २०२५: दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड या पॅन्टोमॅथ ग्रुपचा भाग असलेल्या फंड हाऊसने आज त्यांची पदार्पणीय सक्रिय श्रेणी एनएफओमध्ये जवळपास २००० कोटी रूपये उभारल्याची घोषणा केली आहे. दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडने जवळपास ९००० पिन-कोड्समधून १९५१ कोटी रूपये उभारले, ज्यामधून ब्रँडचे सर्वसमावेशक तत्त्व ‘भारत-सेंट्रिक’मधील दृढ विश्वास दिसून येतो. यासह दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड २०२५ मध्ये एकाच वेळी चार सक्रिय फंड यशस्वीरित्या लाँच करणारी भारतातील पहिली आधुनिक म्युच्युअल फंड हाऊस बनली आहे. या चार फंड योजना आहेत दि वेल्थ कंपनी फ्लेक्झी कॅप फंड, दि वेल्थ कंपनी एथिकल फंड, दि वेल्थ कंपनी अर्बिट्रेज फंड आणि दि वेल्थ कंपनी लिक्विड फंड.
दि वेल्थ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मधू लुनावत यांच्या नेतृत्वांतर्गत कंपनी प्रगतीशील मार्गावर आहे, जेथे ओएनडीसीच्या माध्यमातून एनफओ लाँच करणाऱ्या भारतातील पहिल्या महिलेद्वारे संस्थापित एएमसी बनली आहे आणि द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील गुंतवणूकदारांचा सहभाग दाखवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
व्हॅल्यू रिसर्चमधील डेटानुसार, २०२१ पासून फक्त चार एएमसींनी त्यांच्या एएमसी पदार्पणीय वर्षामध्ये सक्रियपणे व्यवस्थापित फंडाच्या माध्यमातून जवळपास २,००० कोटी रूपये किंवा त्यापेक्षा अधिक निधी उभारला आहे, ज्यामध्ये दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाचा समावेश आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाला सक्रियपणे व्यवस्थापित फंडाच्या माध्यमातून जवळपास २,००० कोटी रूपये उभारणारी २०२१ पासून चौथी एएमसी आणि २०२५ मधील दुसरी एएमसी बनवतो, ज्यामधून त्यांचा वैविध्यपूर्ण गुंतवणूकदार विश्वास आणि वितरक सहभाग दिसून येतो.
दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडामधील गुंतवणूकदारांच्या विश्वासाबाबत मत व्यक्त करत दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडच्या संस्थापिका, व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मधू लुनावत म्हणाल्या, ”वास्तविकत: भारतातील नागरिक तुमच्यावर विश्वास दाखवतात तेव्हा तुम्ही योग्य मार्गाने वाटचाल करत आहात हे तुम्हाला माहित असते. देशातील ९००० पिन-कोड्समध्ये आमच्या पदार्पणात चार सक्रिय फंड्समध्ये २००० कोटी रूपयांचा निधी संपादित करण्यामधून गुंतवणूकदार, वितरक आणि सहयोगींचा विश्वास दिसून येतो, जे संपत्ती निर्मितीचे लोकशाहीकरण करण्याच्या आमच्या दृष्टिकेनाशी संलग्न आहेत. तसेच, म्युच्युअल फंड उद्योगामधील सर्वात लोकप्रिय इक्विटी श्रेणीचे प्रतिनिधीत्व करणारा दि वेल्थ कंपनी फ्लेक्झीकॅप फंडाला बी-३० शहरांमधून उल्लेखनीय सहभाग मिळाला आहे, जो त्यांच्या एकूण एनएफओ संकलनामध्ये जवळपास ५० टक्के योगदान देत आहे. आम्ही या यशाप्रती योगदान दिलेल्या आमच्या वितरकांचे मनापासून आभार व्यक्त करतो.”
दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर श्री. देबाशिष मोहंती म्हणाले, ”आमचे पदार्पण फक्त प्रमाणाबाबत नाही तर वस्तुस्थिती आणि विश्वासाबाबत देखील आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडला ‘डिस्ट्रिब्युटर-फर्स्ट’ आणि ‘भारत-सेंट्रिक’ एएमसी म्हणून स्थित केले, जो मार्केटिंग प्रसिद्धीपेक्षा अर्थपूर्ण समावेशावर लक्ष केंद्रित करतो. आम्ही या महत्त्वपूर्ण टप्प्याकडे सुसंधी म्हणून तसेच भारताच्या वाढत्या आर्थिक आत्मविश्वासाचे पाठबळ असलेल्या शाश्वत संपत्ती-निर्मिती परिसंस्थेचा पाया म्हणून देखील पाहतो.”
उल्लेखनीय बाब म्हणजे, एएआरच्या आकडेवारीनुसार दि वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाने उद्योगामधील इक्विटी इनफ्लोमध्ये (समभाग आवक) ९ टक्क्यांची घट झाली असताना देखील प्रबळ इनफ्लोची (आवक) नोंद केली.









