टाटा एआयएची नवी योजना: ‘शुभ फॅमिली प्रोटेक्ट’ – कुटुंबासाठी एकरकमी पेआऊट आणि नियमित उत्पन्न!

मुंबई, 24 ऑक्टोबर, 2025:  भारतातील एक प्रमुख जीवन विमा कंपनी टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने आणली आहे नवी टाटा एआयए शुभ फॅमिली प्रोटेक्ट योजना. हा टर्म प्लॅन इतर पारंपरिक टर्म प्लॅनपेक्षा वेगळा आणि क्रांतिकारी आहे. यामध्ये तुम्हाला तात्काळ एकरकमी पेआऊट आणि ३० वर्षांपर्यंत लवचिक मासिक उत्पन्न हे दोन्ही मिळते. कुटुंबांना सर्वसमावेशक आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेला हा अशाप्रकारचा पहिला प्लॅन आहे आणि अशा लोकांसाठी तयार करण्यात आला आहे ज्यांना जीवनातील अस्थिरतेमध्ये देखील मनःशांती ढळू नये असे वाटत असते. 

जीवनातील वास्तविक गरजांसाठी तयार करण्यात आलेली योजना

प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू गंभीर मानसिक आघात ठरू शकतो आणि अशा काळात जर आर्थिक समस्यांचे ओझे देखील उचलावे लागणार असले तर आयुष्यावर गंभीर विपरीत परिणाम पडू शकतो. अशा काळात स्पष्ट आणि स्थिर विचारांची सर्वात जास्त आवश्यकता असते पण नेमक्या त्याचवेळी एकरकमी खर्चाचे मोठे ओझे पडते आणि काहीही सांभाळणे खूप जास्त कठीण होऊन बसते.

टाटा एआयएका शुभ फॅमिली प्रोटेक्ट प्लॅनमध्ये या आव्हानांचा सर्वंकष विचार करून अशी योजना प्रदान करण्यात आली आहे, ज्यामध्ये एकरकमी पेआऊट आणि स्थिर मासिक उत्पन्नाची सुरक्षा या दोन्ही लाभांना एकत्र आणले गेले आहे. मागे राहिलेल्यांसाठी ही योजना जीवनरेखा बनते.

नवीन योजनेबद्दल टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे प्रॉडक्ट्स, मार्केटिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि बिझनेस मिड ऑफिसचे चीफ श्री सुजीत कोठारे यांनी सांगितले, “टाटा एआयएमध्ये आम्ही मानतो की, फक्त आर्थिक सुरक्षा प्रदान करणे पुरेसे नसते, कुटुंबांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मदत पुरवणे गरजेचे असते. शुभ फॅमिली प्रोटेक्टमध्ये आम्ही सुनिश्चित करत आहोत की, कुटुंबाला ज्या आर्थिक सुरक्षेची गरज असते ती मिळावी, त्यासोबतच लवचिकता देखील मिळावी जी त्यांची हक्काची असते. ०% जीएसटीने तर ही योजना अजूनच सोपी केली आहे. ज्यांना आपल्या कुटुंबियांचे भविष्य कोणताही अतिरिक्त खर्च न करता सुरक्षित करायचे आहे त्यांच्यासाठी तर हे एक शक्तिशाली साधन आहे.”

हा दृष्टिकोन सुनिश्चित करतो की, कुटुंबांच्या तात्काळ आर्थिक गरजा कव्हर केल्या जातील, त्यासोबतच त्यांना त्यांची बचत संपण्याची चिंता देखील करावी लागणार नाही. अंतिम संस्कारांचा खर्च, कर्जाची परतफेड किंवा इतर कोणतेही अत्यावश्यक खर्च असे आर्थिक ओझे तात्काळ हटवणे गरजेचे असते, त्यासाठी एकरकमी पेआऊट देण्यात आले आहे. शुभ फॅमिली प्रोटेक्टची खरी शक्ती आहे मासिक उत्पन्न, हे एक दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा कवच आहे, जे सतत तुमच्यासोबत राहते आणि कुटुंबाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यात मदत करते.

उदाहरणार्थ, वृद्ध आईवडील जर आर्थिक मदतीसाठी आपल्या मुलांवर अवलंबून असतील तर त्यांच्यासाठी एकरकमी पेआऊट त्यांच्या मेडिकल खर्चासाठी उपयोगी पडेल, त्यांना जी देखभाल आवश्यक आहे ती गंभीर नुकसानीच्या काळात देखील मिळत राहील. मासिक उत्पन्न त्यांना आर्थिक अस्थिरतेच्या ओझ्यापासून वाचवेल आणि नवीन वास्तविकतेशी जुळवून घेण्यात मदत करेल. गंभीर नुकसानीच्या काळात बऱ्याचदा दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष होते, पण मासिक उत्पन्न त्या गरजा पूर्ण करेल आणि त्यांचे मानसिक आरोग्य अजून जास्त बिघडण्यापासून वाचवेल.

एखादी पत्नी जी आता एकटी मागे उरली आहे, तिच्यासाठी गंभीर नुकसानाचा आर्थिक भार अनेक प्रकारे विनाशकारी असू शकतो. शुभ फॅमिली प्रोटेक्टसह, ती मासिक उत्पन्न मिळवून तिचे सामान्य जीवन व्यत्यय न येता पुढे चालू ठेवू शकते. घरातील विविध बिलांपासून ते दैनंदिन गरजांपर्यंत, ती तिच्या जीवनाची गुणवत्ता बिघडू न देता नियमित पेमेंटच्या पायावर तिचे भविष्य घडवू शकते. ती पूर्वीसारखीच घर सांभाळू शकते, तिच्या मुलांची काळजी घेऊ शकते आणि आयुष्यातील इतर सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकते.

पालकांना कायमचे गमावण्याचे भयंकर दुःख अनुभवणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण, त्यांची स्वप्ने आणि त्यांचे भविष्य गमावावे लागू नये. शुभ फॅमिली प्रोटेक्टमधून मिळणारे मासिक उत्पन्न त्यांना त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करेल. शाळेची फी, शिकवणी आणि इतर उपक्रम सर्व पूर्वीसारखेच चालू राहू शकतात. भविष्याची चिंता न करता ते त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात.

शुभ फॅमिली प्रोटेक्टचे विचार करून ठरवण्यात आलेले वैशिष्ट्य म्हणजे अनेक लाभार्थींना नॉमिनेट करण्याची क्षमता. यामुळे प्रत्येकाला आवश्यक असलेला आर्थिक आधार मिळतो. तो जोडीदार असो, मुले असोत किंवा वृद्ध आईवडील असोत, तुमच्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी लाभ वाटा स्पष्टपणे ठरवला जाऊ शकतो, त्यामुळे मोठ्या दुःखाच्या वेळी वाद आणि गोंधळ टाळता येतो. लहान मुलापासून ते वृद्ध आईवडिलांपर्यंत सर्वांना आवश्यक असलेला आर्थिक पाठिंबा मिळतो.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या गरजा लक्षात घेऊन, शुभ फॅमिली प्रोटेक्ट विमा, मनाची शांती, स्थिरता आणि आर्थिक ओझ्याशिवाय पुढे जाण्याची क्षमता प्रदान करते. टाटा एआयएने संरक्षणाची नवी व्याख्या रचली आहे, ज्यामुळे मागे राहिलेल्यांना दीर्घकालीन सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळेल याची खात्री होते.

टाटा एआयए शुभ फॅमिली प्रोटेक्टचे प्रमुख फायदे

  • तात्काळ एकरकमी पेआउट: तात्काळ, तातडीच्या खर्चासाठी जलद आणि सोपे पेमेंट
  • १०-३० वर्षांसाठी मासिक उत्पन्न: दैनंदिन खर्चासाठी सतत आधार
  • लवचिक पेआउट पर्याय: महागाईशी जुळवून घेण्यासाठी निश्चित किंवा वाढणारे मासिक उत्पन्न
  • मल्टिपल नॉमिनी पर्याय: तुमच्या सर्व प्रियजनांची काळजी घेतली जाईल ही निश्चिती तुम्हाला मनःशांती मिळते.
  • टर्मिनल आजार संरक्षण: निदान झाल्यानंतर, विम्याच्या रकमेच्या ५०% रक्कम त्वरित दिली जातात आणि भविष्यातील सर्व प्रीमियम माफ केले जातात.
  • ०% जीएसटी फायदा: वैयक्तिक जीवन विमा योजनांसाठी प्रीमियमवर कोणताही जीएसटी नाही, ज्यामुळे ते कुटुंबांसाठी अधिक परवडणारे बनते.

शुभ फॅमिली प्रोटेक्टसह, टाटा एआयए कुटुंबांना जीवनातील कोणत्याही गोष्टीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार राहण्यास मदत करत आहे – खरोखर ‘प्रत्येक वेळेसाठी तयार’.