हडपसर येथील सह्याद्रि हॉस्पिटलला इन्फ्युजन थेरपीच्या सेवेमुळे इन्युझ या प्रतिष्ठित प्रमाणपत्राने सन्मान

पुणे, २४ ऑक्टोबर, २०२५:  सह्याद्री हॉस्पिटल, हडपसरला हे सांगताना अभिमान वाटत आहे की त्यांनी प्रतिष्ठित इन्फ्युझ (INFUZE) प्रमाणपत्र प्राप्त केले असून, हे मानांकन मिळवणारे हडपसरमधील पहिले हॉस्पिटल ठरले आहे. या मानांकनामुळे हॉस्पिटलने उच्च दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करण्याची आणि इन्फ्युजन थेरपी (शिरेवाटे औषध देण्याची पद्धत) मध्ये जागतिक सर्वोत्तम निकष व कार्यपद्धती आत्मसात करण्याची आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.

इन्फ्युजन नर्सिंग सोसायटी-इंडिया (INS-India) तर्फे दिले जाणारे इन्फ्युज प्रमाणपत्र हे इन्फ्युजन थेरपीसाठी ठरवलेल्या कठोर नियम आणि निकषांचे पालन करणाऱ्या आरोग्य संस्थांना दिले जाते. या कार्यक्रमाचा उद्देश इन्फ्युजन प्रक्रियांमध्ये सुधारणा करून त्यांना एकसारखे आणि व्यवस्थित बनविणे, तसेच रुग्णांची सुरक्षितता आणि उपचारांचे परिणाम अधिक चांगले करणे हा आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित संस्थेची सविस्तर तपासणी केली जाते, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आणि नियमांचे पालन नीटपणे पाहिले जाते.

रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सेवा प्रमुख श्रीमती सोनाली तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित चॅम्पियन टीमच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा सन्मान मिळाल्याची माहिती रुग्णालयाने दिली. या टीमला सघन उपचार युनिटचे संचालक डॉ. कपिल बोरवाके आणि हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक – ऑपरेशन्स, डॉ. अभिजित शिवणकर यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही अधिका-यांचे सक्षण क्लिनिकल नेतृत्व, उत्कृष्ट प्रशासकीय कार्यक्षमता आणि सामूहिक सांघिक कार्य या गोष्टी मान्यता मिळवण्यात अत्यंत निर्णायक ठरल्या.

हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक – ऑपरेशन्स डॉ. अभिजीत शिवणकर म्हणाले, “ इन्फ्युज प्रमाणपत्र मिळाल्याने आम्हांला खूप आनंद होत आहे. हे प्रमाणपत्र आमच्या उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी आणि इन्फ्युजन थेरपीसाठी उच्च मानकांचे पालन करण्याच्या आमच्या निरंतन बांधिलकीला प्रतिबिंबित करते. आमच्या संपूर्ण टीमच्या समर्पणाशिवाय हा टप्पा गाठणे शक्य नसते. हे सन्मान मिळवणारे सह्याद्रि रुग्णालय हे हडपसरमधील पहिले रुग्णालय असल्याचा आम्हांला अभिमान आहे.”

हे यश सह्याद्रि हॉस्पिटलच्या मूळ संकल्पाला अधिक बळकटी देते. त्यांचा संकल्प केवळ पुणे शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवांची गुणवत्ता वाढवण्याचा आहे. यासाठी ते आरोगय सेवेत नवनवीन उपक्रम राबवून नेतृत्व स्वीकारुन आणि रुग्णांना उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्य सेवा देऊ सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आपले ध्येय पुन्हा अधोरेखित करते.