जयपूर अकादमीची विक्रमी विजयासह आगेकूच

By: Editor_Manas

On: Saturday, October 4, 2025 1:42 PM

Google News
Follow Us

पुणे, ४ ऑक्टोबर: कोलकाता वॉरियर्सचा २२-१ असा धुव्वा उडवत जयपूर हॉकी अकादमीने फ गटात अव्वल स्थान पटकावताना म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नवव्या एसएनबीपी अखिल भारतीय (१६ वर्षांखालील मुले) हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

दहा खेळाडूंसह खेळताना जयपूर अकादमीने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. आठव्या मिनिटालाच मोहम्मद अर्कामने मैदानी गोलने खाते उघडले. त्यानंतर गोलांची बरसात सुरू झाली. एकूण गोलांमध्ये पेनल्टी कॉर्नरवरील नऊ, पेनल्टी स्ट्रोकवरील एक आणि बारा मैदानी (फील्ड) गोलांचा समावेश आहे.

जयपूर हॉकी अकादमीकडून मोहम्मद अर्काम (८, ४७, ५०, ५२) आणि मोहम्मद साहिल खानने (२१, ३८, ४०, ४३) प्रत्येकी चार गोल केले. त्यांना राजेंद्र निकलेहपाल आणि ऋषिराज सिंग (प्रत्येकी तीन गोल), दीपक कुमार पटेल आणि शिवा चौहान (प्रत्येकी दोन गोल) तसेच अभिषेक यादव, आशिष राजभर, कुंदन प्रकाश, युनुस खानची (प्रत्येकी एक गोल) चांगली साथ लाभली.

तत्पूर्वी, सेल एचए संघाने ग्रासरूट हॉकी-पश्चिम बंगालचा ४-१ असा पराभव करून ग गटामधून अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. दरम्यान, आर.के. रॉय अकादमीने फ्रेंड्स हॉकी असोसिएशनचा ८-० असा पराभव करून बाद फेरीतील आपला सहभाग निश्चित केला.

त्यानंतर, डार्क-हॉर्सेस एसएनबीपी अकादमीने एनडीएमसी एच.ए.विरुद्ध ५-१ असा विजय मिळवला. सिद्धार्थ ठाकूरने १२ व्या व ५३ व्या; अथर्व कुमारने तिसऱ्या; जॉर्डन डेसमंडने १८ व्या, ४२ व्या मिनिटाला गोल करत विजयात मोलाचे योगदान दिले. एनडीएमसी एच.ए.कडून एकमेव गोल सतपाल इशांतने (३६ व्या) केला.

क्वार्टरफायनलसाठी पात्र ठरलेले आठ संघ:  अ गट– ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमी; ब गट – गुमनहेरा अकादमी; क गट- राउंड ग्लास अकादमी; ड गट – आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी, ई गट- आर.के. रॉय अकादमी; फ गट – जयपूर हॉकी अकादमी; ग गट – सेल एच.ए.; ह गट: एसएनबीपी अकादमी.

अशी रंगेल उपांत्यपूर्व फेरी:

क्वार्टरफायनल १: (अ गट) ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमी विरुद्ध (ह गट) एसएनबीपी अकादमी.

क्वार्टरफायनल २: (ब गट) गुमनहेरा अकादमी विरुद्ध (ग गट) सेल एच.ए.

क्वार्टरफायनल ३: (क गट) राउंड ग्लास अकादमी विरुद्ध (फ गट) जयपूर एच.ए.

क्वार्टरफायनल ४: (ड गट) आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी विरुद्ध (ई गट) आर.के. रॉय अकादमी

निकाल ( चौथा दिवस):

ग गट: सेल एचए: 4(कुजुरकैलाश 2’; अरुण लखरा 4’; एमनगानबा अकोइजम्मले 35’; सुमन किंडो 59’) विजयी वि. ग्रासरूट हॉकी-पश्चिम बंगाल: 1(अनिकेत कुमार 45’). मध्यंतर: 2-0

फ गट: जयपूर हॉकी अकादमी: २२ (मो. अरकम ८’, ४७’, ५०’, ५२’; राजेंद्र निखलेपाल १४’, ४८’, २०’; दीपक कुमार पटेल १७’, १९’; मोहम्मद साहिल खान २१’, ३८’, ४०’, ४३’; शिवा २३’, ४४’; अभिषेक यादव 24’, ऋषिराज सिंग 33’ 53′, 34′; आशिष राजभर 41’; कुंदन प्रकाश 54′; युनूस खान 55’) विजयी वि. कोलकाता वॉरियर्स: 1 (सांगाना कुमार 56’). मध्यंतर: 8-0

ई गट: आरके रॉय अकादमी: 8 (बिट्टू कुमार 3′; सुजित कुमार 8′; सोय संहे 21′; हेमोम पुनित 49′; मुंद्री नारा 54′; हेमरॉन नामजान 56′, 60′; अर्पित यादव 58′) विजयी वि. फ्रेंड्स हॉकी असोसिएशन: 0.

ड गट: कोहिनूर एचए: ४ (गोनवीर सिंग १२’; गर्व गिल २७’, ४४’; अंशप्रीत सिंग ४२’) विजयी वि. ग्रासरूट हॉकी-उत्तर प्रदेश: २(वंश गिरी ४’, १७’). मध्यंतर : 2-2.

ह गट : एसएनबीपी अकादमी: : 5 (सिद्धार्थ ठाकूर 12’, 53’; अथर्व कुमार 3’; जॉर्डन डेसमंड 18’, 42’) विजयी वि. एन एमडीसी एच. ए.: 1 (सतपाल इशांत 36’). मध्यंतर: 3-0.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026