एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’च्या आगामी एपिसोड्समध्ये हास्य, धमाल आणिमनोरंजन मिळणार आहे, जे तुम्हाला तुमच्या आसनावर खिळवून ठेवेल. मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’च्या आगामी एपिसोडबाबत गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ”हप्पू (योगेश त्रिपाठी) त्याच्या धाडसाचे श्रेय पुन्हा एकदा कमिशनर (किशोर भानुशाली) घेत असल्याचे पाहून निराश होतो. स्वत:ची योग्यता सिद्ध करण्याचा निर्धार करत हप्पू ठरवतो की, पुढच्या वेळेला तो थेट डीआयजीला त्याच्या धाडसाबाबत कळवेल. लवकर, त्याला बारमध्ये ऐकायला मिळते की पिंकी गँग बँकेमध्ये चोरी करण्याचे नियोजन करत आहे. मोठे यश मिळवण्याच्या उत्साहात तो मदतीसाठी बेनीला (विश्वनाथ चॅटर्जी) सोबत घेतो. पण, राजेश हप्पूला चोरीच्या योजनेबाबत वर्णन करताना ऐकते तेव्हा तिला गैरसमज होतो की हप्पू बँकेमध्ये चोरी करणार आहे. घाबरून ती अम्माला (हिमानी शिवपुरी) सर्वकाही सांगते, तेव्हा अम्मा राजेशला बाबाच्या भविष्याची आठवण करून देते की, हप्पूच्या चुकीमुळे राजेशला तुरूंगामध्ये जावे लागू शकते. दरम्यान ऋतिक, चमची आणि रणबीर देखील त्यांच्यामधील संवाद ऐकतात आणि इतरांपूर्वी त्यांच्या वडिलांना ‘रंगेहात’ पकडून त्यामधून पैसा मिळवण्यासाठी योजना आखतात. सर्वांसह खरी पिंकी गँग बँकेमध्ये येते तेव्हा गोंधळ निर्माण होतो. हप्पू गोंधळ दूर करू शकेल का की, त्याला त्याची निष्ठा पुन्हा गमवावी लागेल?”
मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या आगामी एपिसोडबाबत शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्हणाल्या, ”मॉडर्न कॉलनीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, कारण विभुती (आसिफ शेख) आणि प्रेम (विश्वजीत सोनी) आमदाराच्या मदतीने रोमियो ज्युलिएट नाटकाचे आयोजन करत आहे. सुरूवातीला उत्सुक नसलेले अनिता (विदिशा श्रीवास्तव) आणि तिवारी (रोहिताश्व गौड) जास्त पैसा मिळणार असल्याचे समजल्यानंतर उत्साहाने पुढाकार घेतात. पण यामध्ये ट्विस्ट आहे? विभुती आणि अंगूरी त्यांचा परफॉर्मन्स इंग्रजीमध्ये सादर करतात, तर अनिता व तिवारी भोजपुरीमध्ये परफॉर्मन्स सादर करतात. पण गोंधळाची स्थिती निर्माण होते, जेथे स्वदेशी संस्कृती संस्थेचा प्रतिनिधी नियम कुमार नाटकावर आक्षेप घेतो आणि जाहीर करतो की, विभुती आणि अंगूरी जोपर्यंत राखी बांधत नाही तोपर्यंत एकत्र परफॉर्म करू शकत नाही. त्यानंतर हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण, विलक्षण कृत्ये आणि सांस्कृतिक ड्रामा सुरू होतो. बहुप्रतिक्षित रोमियो-ज्युलिएट नाटक अखेर होईल का की यावेळी रंगभूमीवर संस्कृतीचा विजय होईल!”
पहा मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ रात्री १० वाजता आणि ‘भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर!









