वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि वारकरी, कीर्तनकार यांची नवीन पिढी घडवणाऱ्या देहू, आळंदी येथील विविध वारकरी शिक्षण संस्थांच्या समस्या, आव्हाने आणि त्यावरील उपाय तसेच देव-देश-धर्म यांवर होणारे आघात, त्यांवरील उपाययोजना काढून त्यानुसार कृतिप्रवण होणे यासाठी सनातनविद्या फाउंडेशन, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि स्वराज्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी-धार्मिक शिक्षण संस्थांच्या संमेलनाचे आयोजन शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ या दिवशी सकाळी ९.३० ते सायं. ६.०० यावेळेत फ्रूटवाले धर्मशाळा, आळंदी देवाची,ता खेड, जिल्हा पुणे याठिकाणी करण्यात आले आहे.या संमेलनामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या वृत्ताला आपल्या सुप्रसिद्ध वर्तमान पत्रातून / वृत्तवाहिनीतून उचित प्रसिद्धी द्यावी आणि आपल्या प्रतिनिधीला वृत्तसंकलनासाठी पाठवावे. हि नम्र विनंती.
संमेलनात मार्गदर्शन करणारे प्रमुख वक्ते
उदघाटन प्रसंगी दीपप्रज्वलन ,पूजन,शिववंदना तसेच मान्यवरांचा सत्कार होणार असून प्रास्ताविक संचालक सनातन विद्या फौंडेशनचे श्री. प्रकाश लोंढे हे करणार आहेत .
१) डॉ श्री. अंकुश आगरवाल,हिंदू जागरण – विषय : भारताची आंतरिक सुरक्षा तथा समस्या आणि उपाय
२) श्री. अविनाश धर्माधिकारी,आय ए एस – विषय: सनातन धर्म आणि राष्ट्र उभारणीत वारकरी व धार्मिक शिक्षण संस्था यांचे योगदान आणि महत्व.
३) श्री संदीप लोहार महाराज : विषय – वारकरी व शिक्षण संस्थांचे प्रश्न,आव्हाने आणि उपाय
४) श्री. बाजीराव बांगर महाराज,विषय – वारकरी व धार्मिक शिक्षण संस्थांच्या अभ्यास क्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्व.
५) श्री.रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते,हिंदु जनजागृती समिती, विषय : हिंदु धर्माच्या विरोधात होणारे षडयंत्र – फेक नरेटिव्ह
६) श्री सुनील घनवट,हिंदु जनजागृती समिती,संघटक महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य _ विषय: वारीतील डावे आणि शहरी नक्षलवादी यांची घुसखोरी
या व्यतिरिक्त यावेळी दिल्लीचे वरिष्ठ आधिवक्ता ॲड. श्री. अश्विनीजी उपाध्याय,श्री दिलीप देशमुख,माजी धर्मादाय आयुक्त, ॲड. श्रीमती रोहिणी पवार, सी.ए. श्री. राम डावरे यांच्यासह गुरुवर्य ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर शिंदे महाराज (मोठे माऊली), गुरुवर्य ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर कदम महाराज (छोटे माऊली), ह.भ.प. श्री. संग्राम बापू भंडारे आदी मान्यवर उपस्थित राहून संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत .