पुणे – पुणे ते नगर (अहिल्यानगर) दरम्यान सध्या बसने ३ ते ४ तास लागणारा प्रवास आता केवळ दीड तासात होणार आहे. महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर दरम्यान समांतर दुहेरी रेल्वेमार्ग उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. ने या प्रकल्पाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला आहे.
🔧 प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
- लांबी: ९८.५७५ कि.मी.
- वेग मर्यादा: १६० कि.मी./तास
- पूर्णत्व कालावधी: ४ वर्षे
- एकूण जमीन आवश्यक: ७८५.८९८ हेक्टर
- खासगी: ७२७.९२५ हेक्टर
- सरकारी: १३.०१६ हेक्टर
- वनजमीन: ४४.९५६ हेक्टर
📍 प्रस्तावित १२ स्थानके:
- लोणी काळभोर
- कोलवडी
- वाघोली
- वढू
- जातेगाव
- रांजणगाव एमआयडीसी (मुख्य स्थानक)
- कोहकडी
- सुपे एमआयडीसी (मुख्य स्थानक)
- कामरगाव
- चास
- अहिल्यानगर
🏞️ भूसंपादन:
हा रेल्वेमार्ग हवेली, शिरूर, पारनेर आणि अहिल्यानगर या चार तालुक्यांतून जाणार असून, सर्वाधिक जमीन शिरूर तालुक्यातून जाणार आहे.
🔄 रेल्वे नेटवर्कचा विस्तार:
या प्रकल्पासोबत तळेगाव ते उरुळी कांचन मार्गाचाही समावेश आहे. पूर्वी तो बाह्यवळण मार्ग म्हणून नियोजित होता, मात्र आता तो दुहेरी करून तिसरी-चौथी मार्गिका म्हणून वापरला जाणार आहे. यामुळे पुणे स्थानकावरून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा वळसा आणि वेळ वाचणार आहे.
🛤️ महत्त्व:
हा रेल्वे प्रकल्प केवळ वेळबचतच नव्हे, तर महामार्गावरील वाहतूकदाटी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना जलद व आरामदायक प्रवासासाठी महत्वाचा ठरणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.