ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

By: Editor_Pratik

On: Thursday, March 12, 2026 9:15 AM

Google News
Follow Us

पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात गुरुवारी अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. देशभरातून तसेच परदेशातून पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या ऐतिहासिक स्थळाजवळ आग लागल्याने नागरिक आणि पर्यटकांची धांदल उडाली.

शनिवार वाडा हे देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून भारताच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो पर्यंटक पुण्यात शनिवार वाड्याल भेट देतात.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार वाड्याजवळ देसाई कॉलेजसमोर झाडांचा पालापाचोळा आणि झाडांच्या फांद्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाणी मारून आग आटोक्यात आणली. आगीचे लोट शनिवार वाड्याच्या एका दरवाजापर्यंत पोहोचले होते; मात्र वेळेत कारवाई झाल्याने ऐतिहासिक वास्तूचे कोणतेही नुकसान झाले नाही.

देशभरातील, जगभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग लागल्याने अनेकांची धांदल उडाली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. मात्र परिसरात साचलेले वाळलेले गवत आणि पालापाचोळा यामुळे स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

शनिवार वाडा हे देशातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून दरवर्षी महाराष्ट्रासह देश-विदेशातून लाखो पर्यटक येथे भेट देतात. पेशवाईच्या इतिहासाशी निगडित असलेल्या बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या अनेक ऐतिहासिक खुणा आजही या वाड्यात पाहायला मिळतात. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

शनिवार वाडा हे देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून भारताच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो पर्यंटक पुण्यात शनिवार वाड्याल भेट देतात.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026